विशेष प्रतिनिधी
पुणे : Sharad Pawar मनोज जरांगे यांच्या मराठा उमेदवारांना शरद पवार घाबरले आणि त्यांनी असीम सरोदे यांच्याकरवीच जरांगे यांना “मॅनेज” केले. स्वतः असीम सरोदे यांनी बारामतीच्या सभेत बोलताना हा गौप्यस्फोट केला. मात्र त्यांनी या गौप्यस्फोटाला लोकशाही वाचविण्याचा मुलामा लावला.Sharad Pawar
बारामतीत बोलताना असीम सरोदे म्हणाले :
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच सांगितल्यामुळे मी मनोज जरांगे यांच्याशी बोललो. त्यांनी मराठा उमेदवार उभे केले तर मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होऊन महाविकास आघाडीला आणि शरद पवारांच्या उमेदवारांना फटका बसेल, असे त्यांना सांगितले. माझे भाग्य आहे की मनोज जरांगे यांनी माझे ऐकले. त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी हातभार लावला.Sharad Pawar
शरद पवार माझ्या ऑफिसमध्ये आले होते, त्यावेळी मी त्यांना जरांगे यांच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाविषयी सांगितले, त्यावेळी पवारांनी मला जरांगेंशी बोलण्याची सूचना केली. उद्धव ठाकरेंना पण मी जरांगे यांच्या संदर्भात सांगितल्यावर त्यांनी देखील मला जरांगेंशी बोलायला सांगितले.Sharad Pawar
Narendra Modi शिवतीर्थावर मोदींची गर्जना- मविआचे लोक तुष्टीकरणाचे गुलाम, त्यांची विचारधारा महाराष्ट्राचा अपमान करणारी
विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नावाखाली एवढे उमेदवार उभे राहिले तर मतविभाजनाचा फायदा कोणाला होईल, म्हणून मी जरांगे यांच्याकडे अंतरवली सराटीला गेलो ते म्हणाले निवांत बोलायचे असेल, तर आलेल्या सर्वांना आधी मी भेटून बाहेर घालवतो. नंतर आपण बोलू.
जरांगे आणि माझी बैठक रात्री 11.30 वाजता सुरू झाली. आमची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली ही बैठक रात्री 3.00 वाजेपर्यंत चालली. मराठा समाजासाठी तुम्ही चांगलं काम करताय आरक्षणाचा विषय लावून धरलाय तो सामाजिक कामाचा विषय आहे तुम्ही सामाजिक भूमिका कायम ठेवा असे मी जरांगे यांना सांगितले. जरांग्यांनी उमेदवार उभे करावेत असे कोणा कोणाला वाटते याची यादी काढली तर त्यात फडणवीस गिरीश महाजन मनोज हाके यांची नावे सगळ्यात वर आली नंतर मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला त्यांनी माझे ऐकले हे माझे भाग्य आहे.
असीम सरोदे यांनी जरी लोकशाहीचा मुलामा लावून ही सगळी स्टोरी सांगितली असली, तरी प्रत्यक्षात शरद पवार मनोज जरांगे यांच्या मराठा उमेदवारांना घाबरले आणि असीम सरोदे यांच्याकरवी त्यांनी मनोज जरांगे यांना “मॅनेज” केले. मनोज जरांगे देखील पवारांसाठी “मॅनेज” झाले, हेच यातून ऐन निवडणुकीच्या मध्यावर उघड्यावर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App