मुख्यमंत्री + दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण देऊन पवारांनी “लावून घेतले” बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमाचे “आवतान”!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा अंतिम टप्पा सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे. परवा 2 मार्चला बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नमो रोजगार मेळावा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत असणार आहेत.Sharad pawar invites CM and DyCMs for lunch in govindbaugh baramati to avoid direct confrontation with ajit pawar

पण या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी एक राजकीय गुगली टाकत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण देत शासकीय कार्यक्रमाचे “आवतान” लावून घेतले आहे. बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना निमंत्रण आहे, पण स्वतः शरद पवारांना शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. त्यामुळे त्याचे “आवतान” लावून घेण्यासाठी पवारांना हा निमंत्रण प्रपंच करावा लागला आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या 2 मार्चला बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम अजित पवार घेणार असल्यामुळे त्यांच्या पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचंड शक्तिप्रदर्शन बारामतीत होणे अपेक्षित आहे.

या पार्श्वभूमीवर बारामतीतच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राजकीय ताकद कमी दिसून वाताहत होऊ नये यासाठी आटापिटा करत पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण देत आपल्याला शासकीय कामात कार्यक्रमाचे निमंत्रण मिळवून घेतले आहे. शासकीय कार्यक्रमात बारामतीच्या लोकप्रतिनिधी म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना प्रोटोकॉल नुसार निमंत्रण होतेच, पण शरद पवारांना निमंत्रण नाही. त्यांचे शासकीय निमंत्रण पत्रिकेवर नावही नाही. त्यामुळे त्यांना बारामतीतल्या कार्यक्रमात आपण कुठेच दिसणार नाही किंवा दिसलो तरी “केंद्रस्थानी” असणार नाही याची चाहूल लागली आणि त्याला सकारात्मक पर्याय काढायचा म्हणून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाच आपल्या घरी जेवायला बोलावले. त्याचे निमंत्रण पत्र त्यांनी तिघांनाही पाठविले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे-फडणवीस निमंत्रण स्वीकारणार?

बारामतीतला नमो रोजगार मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या 12 एकरच्या मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे यांना निमंत्रण असले तरी प्रत्यक्षात कार्यक्रमावर अजित पवारांचे पूर्ण वर्चस्व असणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना शासकीय प्रोटोकॉलनुसार निमंत्रण नाही कारण ते बारामतीचे खासदार नसून ते राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांचा थेट बारामतीशी शासकीय प्रोटोकॉल नुसार संबंध नाही ही बाब पवारांच्या लक्षात येताच आपण आपल्याच गावात साईडलाईन झाल्याचे दिसू नये म्हणून पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. पण आता हे निमंत्रण हे तिन्ही नेते स्वीकारणार का?? त्यांच्या प्रोटोकॉल मध्ये आणि राजकारणात ते बसते का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sharad pawar invites CM and DyCMs for lunch in govindbaugh baramati to avoid direct confrontation with ajit pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात