झारखंडच्या जामतारा येथे भीषण रेल्वे दुर्घटना; 12 जणांचा मृत्यू!


आग लागल्याची सूचना ऐकून प्रवाशांनी उड्या मारल्या आणि दुसऱ्या ट्रेनखाली आले


विशेष प्रतिनिधी

झारखंडच्या जामतारा येथून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेची धडक बसून 12 जणांचा मृत्यू झाला. जामतारा-करमातांडच्या काळझरियाजवळ लोकांना रेल्वेची धडक बसली.A terrible train accident at Jamtara Jharkhand 12 people diedवास्तविक, एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची प्रवाशांना माहिती मिळताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेमधून उडी मारली. इतक्यात समोरून दुसरी रेल्वे आल्याने ते रेल्वेखाली आले. . झाझा-आसनसोल रेल्वे समोरून जात असताना या रेल्वेची लोकांना धडक बसली. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर काही लोक जखमी झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच रेल्वे प्रशासनासह स्थानिक प्रशासनही घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली. त्याचवेळी घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी रेल्वेमधून उड्या मारल्या होत्या.

A terrible train accident at Jamtara Jharkhand 12 people died

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात