झामुमोचे आमदारही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कथित जमीन घोटाळ्यात अडकलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक मुख्यमंत्र्यांच्या रांची येथील निवासस्थानी पोहोचले आहे. झामुमोचे आमदारही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत. ED team reaches Jharkhand Chief Ministers residence will interrogate Hemant Soren
रांचीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वीच शहरात ठिकठिकाणी फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स पाठवले होते.
ईडीच्या या समन्सवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी दुपारी एक वाजता उत्तर देण्यासाठी ईडीला वेळ दिला होता. याआधी हेमंत सोरेन अचानक बेपत्ता झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यानंतर ईडीने त्यांचा शोध सुरू केला. मात्र हेमंत सोरेन सोमवारी रात्री उशीरा रांचीला पोहोचले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी ईडीच्या चौकशीपूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची भेट घेतली. हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या अटकेदरम्यान, त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्यासाठी पक्षाच्या आमदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App