विशेष प्रतिनिधी
सातारा : गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांनी प्रगतीची भरारी मारावी, या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेची तयार केलेली घटनाच सध्याच्या संचालकांनी बदलली. राज्याचा मुख्यमंत्री रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. मात्र, त्यांनी घटना स्वतःच बदलली आणि स्वतःलाच तहहयात अध्यक्ष करून घेतले, असा आरोप सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचे नाव न घेता केला. उदयनराजे सातारा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. Sharad pawar grabbed Rayat shikshan sanstha; udayan raje targets pawar
खा. उदयनराजे म्हणाले, विरोधकांना जिल्ह्यामध्ये चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून मिळू नये हे विरोधकांचे दुर्दैव, शोकांतिका आहे. घोटाळे करणारे भ्रष्टाचारी, माथाडी, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या पैशाचा अपहर करणारे उमेदवार सातारकरांसमोर उभे केले आहेत. लोकशाहीच्या न्यायालयात त्यांना नक्कीच शिक्षा होईल.
उदयनराजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रंदिवस विकासासाठी झटत आहेत. आम्हा सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे. विकासाचा विचार आहे. या उलट विरोधी पक्षाकडे विस्कळीतपणा आणि स्वार्थ एवढेच दिसून येतो. आम्ही सर्व एका विचाराने एकत्र येत आहोत. एकत्र राहिलो आहोत. आमचे उद्दिष्ट एक आहे. आमचा विचार विकासाचा आहे. त्यामुळे आम्ही केवळ घोषणा देत नाही, तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो. यासाठी मला सहा विधानसभा मतदारसंघातून भक्कम पाठिंबा आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या घटनेसंदर्भात उदयनराजे म्हणाले, गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांनी प्रगती करावी, या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. मात्र, या शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तयार केलेली घटनाच सध्याच्या संचालकांनी बदलली. राज्याचा मुख्यमंत्री रयत शिक्षण संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा. त्यामुळे या शिक्षण संस्थेला मदत व्हावी. ही मदत गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्हावी, असा कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार होता. मात्र, संस्थेची घटना स्वतःच बदलली आणि स्वतःलाच तहहयात अध्यक्ष करून घेतले. यामध्ये लोककल्याण, गोरगरिबांसाठी काम करणे हा यशवंत विचार संपवून टाकला. खरे तर रयत शिक्षण संस्था स्थापन करण्यात आमच्या घराण्याचे महत्वाचे योगदान आहे. त्याचा मला अभिमान आहे. पण सध्या सुरू असलेला हा प्रकार यशवंत विचारांना तिलांजली देणाराच आहे, असा आरोपही त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App