विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad pawar राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जातीयवादी राजकारणाचे आरोप करताच शरद पवारांनी त्यांच्याकडे त्याचे पुरावे मागितले. राज ठाकरेंनी पुणेरी पगडी आणि महात्मा फुलेंची पगडी यांचा किस्सा सांगून पवारांच्या जातीयवादी राजकारणाचे पुरावे दिले, पण त्यावर पवारांनी राज ठाकरे काहीही बोलत असतात त्यांच्याकडे दुर्लक्षच केलेले बरे, असे सांगून आज हात झटकून टाकले!!Sharad pawar
महाराष्ट्रात प्रत्येकाला स्वतःच्या जातीचा अभिमान होता. पण दुसऱ्याच्या जातीचा द्वेष नव्हता. शरद पवारांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यानंतर जातीयवादी राजकारण सुरू केले. त्यामध्ये स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगण्यासाठी दुसऱ्या जातीचा द्वेष करणे सुरू केले, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यावर शरद पवारांनी मी जातीयवादी राजकारण केल्याचा एक तरी पुरावा राज ठाकरेंनी द्यावा, असे आव्हान दिले. राज ठाकरेंनी ते आव्हान स्वीकारून पुण्यातल्या शरद पवारांच्या जातीय राजकारणाचे उदाहरण समोर आणले.
शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमामध्ये लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी डोक्यावरती घालायचे नाकारून इथून पुढे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात महात्मा फुलेंची पगडी घातली पाहिजे, असे आदेश काढले होते.
राज ठाकरेंनी तो किस्सा सांगून शरद पवारांचे जातीयवादी राजकारण समोर आणले. पण या पुराव्यातून ऐन निवडणुकीत आपली गोची झाली हे पाहून शरद पवारांनी राज ठाकरे काहीही बोलत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे!!, असे सांगून आज हात झटकून टाकले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App