गांधीजींचे गुरु गोखले हे जिनांचेही मार्गदर्शक, फाळणीचा रक्तरंजित इतिहास अभ्यासातून वगळा; शरद पवारांची सूचना


विशेष प्रतिनिधी

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकालात केंद्र सरकारने 14 ऑगस्ट हा विभाजन विभीषिका दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधकांच्या पोटात राजकीय गोळा आला आहे. विभाजन विभीषिका दिवसाच्या निमित्ताने देशाच्या फाळणीसाठी कोण जबाबदार होते?? कोणी त्यावेळी निर्णय घेतले?? याचा उलगडा होत असताना फाळणीचा रक्तरंजित इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे. सीबीएससी बोर्डाने फाळणीच्या इतिहासाला शालेय अभ्यासक्रमात स्थान दिले आहे. पण आता हेच विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना नको आहे.Sharad pawar demands history of partition Horrors be dropped from history books

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फाळणीचा रक्तरंजित इतिहास शालेय अभ्यासक्रमातून वगळण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले हे मोहम्मद अली जिनांचे मार्गदर्शक होते, असा इतिहास पवारांनी सांगितला आहे.सरहद संस्थेच्या या कार्यक्रमात शरद पवार यांनीही संबोधित केले. ही संस्था देशातील तरुण पिढीमध्ये काम करतीये. काश्मीर सारखे महत्वाचं राज्य आहे. शेजारच्या राष्ट्रामुळे वेगळ्या स्थितीला सामोरं जावं लागतंय. याचा फटका हा तरुण पिढीला बसतोय. एक अस्वस्थता तरुण पिढीमध्ये निर्माण होतीये. ही अस्वस्थता निर्माण व्हावी आणि भारतात काय करता येईल यासाठी शेजारचं राष्ट्र प्रयत्न करतंय. त्याचा परिणाम हा तरुण पिढीला सहन करावा लागत आहे, असं शरद पवार म्हणालेत.

पुणे शहरात गोखले संस्था ही मोठी संस्था काम करते. ही संस्था उभी करताना गोखल्यांच्या बरोबर अनेक राज्यातील लोकांनी मदत केली.या देशात महात्मा गांधीचं नावं घेतलं. महात्मा गांधींचे गुरु हे गोपाल कृष्ण गोखले होते. पाकिस्तानातही गोखलेंचा उल्लेख पुस्तकात आढळतो. मोहम्मद अली जिनांना मार्गदर्शन करण्यासाठी गोपाळ कृष्ण गोखलेंचे योगदान होते, असे शरद पवार म्हणाले.

त्याचवेळी त्यांनी फाळणीचा रक्तरंजित इतिहास वाचनाचा विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होतो आहे. त्यामुळे तो इतिहास शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून वगळावा. महाराष्ट्राच्या सरकारने ही सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी केली. पवारांच्या या मागणीतून ते नेमके काय साध्य करू इच्छित आहेत??, अशी विचारणा आता सोशल मीडियातून सुरू झाली आहे

Sharad pawar demands history of partition Horrors be dropped from history books

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात