कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे चाचणीदरम्यान ‘DRDO’चे ड्रोन कोसळले!


ड्रोन अपघाताची माहिती परिसरात पसरल्याने स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली होती.

विशेष प्रतिनिधी

चित्रदुर्ग :  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) तापस मानवरहित हवाई वाहन (यूएव्ही) रविवारी सकाळी कर्नाटकातील चित्रदुर्गातील एका गावाजवळील शेतात कोसळले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, TAPAS चाचणीदरम्यान UAV क्रॅश झाला आहे. DRDOs drone crashed during testing at Chitradurga in Karnataka

याबाबत संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, “डीआरडीओने विकसित केलेले तापस ड्रोन कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका गावात चाचणीदरम्यान क्रॅश झाले.”

त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “डीआरडीओ या अपघाताची माहिती संरक्षण मंत्रालयाला देत आहे आणि अपघाताच्या विशिष्ट कारणांवर संशोधन केले जात आहे.” त्याचवेळी ड्रोन अपघाताची माहिती परिसरात पसरल्याने स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली होती.

DRDOs drone crashed during testing at Chitradurga in Karnataka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात