विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत चांगला परफॉर्मन्स दाखविल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बैठक झाली. तिथे सर्व नेत्यांनी विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते उपस्थित होते. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार या पत्रकार परिषदेला आले नव्हते.Sharad pawar avoided to answer question regarding state cooperative bank scam
या पत्रकार परिषदेमध्ये शिखर बँक घोटाळ्यासंदर्भातला एक प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावेळी शरद पवार यांच्या शेजारी पृथ्वीराज चव्हाण बसले होते. संबंधित विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, एवढेच एका वाक्यात उत्तर देऊन शरद पवारांनी त्या विषयावर सविस्तर बोलणे टाळले.
शिखर बँक घोटाळ्याचा विषय असा :
शिखर बँक घोटाळा हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना बाहेर आलेला घोटाळा आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी रिझर्व बँकेच्या विशिष्ट अहवालानुसार राज्य शिखर बँकेवर कारवाई केली. पवारांच्या वर्चस्वाखाली असलेले संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला होता. त्यावेळी पवारांना पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्णय प्रचंड झोंबला होता. पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेण्याएवढी पवारांची त्यावेळी मजल गेली होती.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर अनुक्रमे 120 (ब) आणि 420 या कलमाखाली शिखर बँक घोटाळ्याचा आरोप आहे. नियमबाह्य कर्ज वाटप आणि कर्ज वाटप फसवणूक या संदर्भातली ही कलमे आहेत. ही सगळी कलमे पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कारकिर्दीत लागली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची कारकीर्द झाली. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने शिखर बँक घोटाळ्याच्या संदर्भातला चौकशी आणि तपासाचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला.
आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि शेखर बँक घोटाळ्यासंदर्भात फार पूर्वीपासून न्यायालयीन लढाई लढणारे माजी आमदार माणिकराव जाधव यांनी राज्य सरकारच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात कोर्टात धाव घेतली. कोर्टाने 29 जून रोजी या संदर्भातली सुनावणी ठेवली आहे. अर्थातच या प्रकारामध्ये अजित पवार आणि शरद पवार अडचणीत आले. पत्रकारांनी आजच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मधल्या पत्रकार परिषदेत पवारांना या क्लोजर रिपोर्ट संदर्भातलाच प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी संबंधितांना न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे, पण हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे उत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण शेजारी बसले असताना शिखर बँक घोटाळे संदर्भात अधिक भाष्य करणे पवारांनी टाळले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App