माध्यमी चाणक्य आणि भासमान इंदिरा!!

Sharad pawar and priyanka Gandhi

काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस मोठा गाजावाजा करून साजरा करण्यात आला आणि आज लोकसभेत प्रियांका गांधी यांनी पहिले भाषण केले त्यामुळे वर सुचलेले शीर्षक दिले.Sharad pawar and priyanka Gandhi; “illusioned” chanakya and indira Gandhi

शरद पवारांचा 2024 मध्ये 85 वा वाढदिवस आहे. त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे 85 आमदार निवडून आणून त्यांना भेट देऊ, अशी गर्जना त्यांचे नातू रोहित पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच केली होती, पण प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स एवढा घसरला की, त्या पक्षाचे 85 आमदार निवडून येणे सोडाच, 10 आमदार निवडून आणताना शरद पवारांसकट पक्षाच्या सगळ्या नेत्यांची दमछाक झाली.



 

वास्तविक लोकसभा निवडणुकीत पवारांच्या पक्षाचा परफॉर्मन्स 80 % होता. तो विधानसभेत 20 % वर आला, पण म्हणून पवारांचा वाढदिवस काही कमी गाजावाजा करून साजरा झाला नाही. उलट त्या वाढदिवसानिमित्त पवारनिष्ठ माध्यमांनी पवारांचे महत्त्व वाढवून ठेवले, ते इतके की, आता पवार भाजपा बरोबर जाणार त्यासाठी भाजपच्या चाणक्यांची आणि पवारांच्या एका वरिष्ठ नेत्याची गौतम अदानींच्या घरी बैठक झाली वगैरे बातम्यांच्या पुड्या माध्यमांनी सोडल्या.

2019 पासून पवारांची “चाणक्य” ही प्रतिमा मराठी माध्यमांनी एवढी त्यांच्या समर्थकांच्या मनावर ठसवली आहे की, खुद्द पवारांच्या घरातलेच लोक आता त्यांना खरंच “चाणक्य” मानू लागले आहेत. म्हणूनच आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एक व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त करताना पवारांचा “चाणक्य” म्हणून उल्लेख केला.

चाणक्यांचा पक्ष नापास

पण या “चाणक्यांना” लोकसभेतल्या 80 % परफॉर्मन्स टिकवणे तर सोडाच, विधानसभेत 35 % परफॉर्मन्स देखील टिकवता आला नाही. तो 20 % पर्यंत खाली घसरला. म्हणजेच पवारांचा पक्ष चक्क विधानसभा निवडणुकीत नापास झाला. बाकी मराठी माध्यमवीरांचा दिल्लीतल्या खऱ्या चाणक्यांची कधी ओळख करून घेण्याचा वकूबच नसल्याने त्यांनी पवारांच्या स्थानिक राजकारणाच्या बळावर त्यांना चाणक्य वगैरे उपमा देऊन ठेवल्या. त्यामुळे दिल्लीत नावे पण गल्लीत आणि पवारांच्या घरात त्यांची “चाणक्य” प्रतिमा ठसली, हे मात्र सुनंदा पवारांच्या वक्तव्याच्या निमित्ताने उघड झाले.

जे शरद पवारांचे तेच काँग्रेसी “भासमान इंदिरांचे”!!

प्रियांका गांधींनी आज लोकसभेमध्ये राज्यघटनेवर भाषण केले. ते भाषण साधारण 25 – 30 मिनिटांचेच होते, पण आपल्या कन्येचे भाषण ऐकायला सोनिया गांधी या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेचे कामकाज बाजूला ठेवून लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत आल्या होत्या. प्रियांकांनी जोरदार भाषण केले. देशाची सगळी जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरूंवर झटकून तुम्ही मोकळे होणार का??, असा मोदी सरकारला परखड सवाल केला. तुम्ही इतिहासाबद्दल बोलता, आता वर्तमानाबद्दल बोला, असे सरकारला खडसावले. त्यामुळे काँग्रेसचे नेते एवढे खुश झाले की, त्यांना प्रियांका गांधी मध्ये चक्क “इंदिरा गांधी” भासमान झाल्या!!

तशीही प्रियांकांमध्ये इंदिरा गांधी पाहण्याची काँग्रेस नेत्यांची जुनी सवय आहे. कारण कुठलाही गांधी परिवाराचा आधार मिळाल्याशिवाय बाकीच्या काँग्रेस नेत्यांच्या वेली उभ्याच राहू शकत नाहीत. पण प्रियांकांनी जोरदार भाषण केल्यामुळे राहुल गांधींचे नेतृत्व फिके पडले आणि प्रियांकाचे नेतृत्व पुढे आले. काँग्रेसी नेत्यांनी प्रियांका गांधीं भोवती फेर धरला.

पण काँग्रेसी नेते हे विसरले की, इंदिरा गांधी वयाच्या 48 व्या वर्षी पंतप्रधान बनल्या होत्या. काँग्रेसच्या तीन पिढ्या त्यांच्या हाताखाली केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री बनून राजकारणात स्थिरावल्या होत्या. त्यामुळे इंदिरा गांधींची विशिष्ट कर्तृत्ववान नेता म्हणून प्रतिमा प्रस्थापित झाले होते इंदिरा गांधींच्या हाताखाली तयार झालेल्या काही नेत्यांनी नंतर मोठे राजकीय कर्तृत्व करून दाखवले होते. त्यामुळे इंदिरा गांधींची प्रतिमा देखील उजळली होती.

पण यापैकी प्रियांकाकडे वयाच्या 52 व्या वर्षी देखील काही नाही. त्या 52 व्या वर्षी लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे खरे राजेकीय कर्तृत्व सिद्धच व्हायचे आहे. सोनिया गांधींनी राहुल आणि प्रियांकांचा वकूब माहिती असल्याने त्यांच्यावर थेट कुठली जबाबदारीच अद्याप टाकलेली नाही. राहुल गांधींवर जबाबदारी टाकून पाहिली, तर काँग्रेस 209 खासदारांवरून 44 खासदारांवर आली होती. नंतर ती 54 वर पुढे सरकली होती. शेवटी राहुल गांधींची अध्यक्ष पदाची जबाबदारी काढून घ्यावी लागली, पण ते काही असले तरी काँग्रेसी नेत्यांना आज प्रियांकांमध्ये “इंदिरा गांधी” भासमान झाल्या हे खरे!!

बाकी राजकीय कर्तृत्वाचे काय, ते नंतरही बघता येईल, पण “भासमान दृश्य” बघायला आणि स्थानिक राजकारणाच्या बळावर एखाद्याला “चाणक्य” म्हणून चढवून ठेवायला काही पैसे पडत नाहीत, उलट झाला, तर चमच्यांचा लाभच होतो!!

Sharad pawar and priyanka Gandhi; “illusioned” chanakya and indira Gandhi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात