वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : Biden अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा कार्यकाळ जानेवारीत संपत आहे. मात्र, ते त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अनेक मोठे निर्णय घेण्यात व्यग्र आहेत. या दिशेने त्यांनी अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या 1500 कैद्यांची शिक्षा माफ केली आहे. त्यापैकी 4 भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत. Biden
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले की, अमेरिका संभाव्यतेच्या पायावर आणि दुसरी संधी देण्याच्या वचनावर उभी आहे. राष्ट्राध्यक्ष या नात्याने, माझ्याकडे अशा लोकांना क्षमा करण्याचा अधिकार आहे जे त्यांच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करतात आणि ज्यांना अमेरिकन समाजाच्या मुख्य प्रवाहात परत यायचे आहे. यामध्ये विशेषतः अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या लोकांचा समावेश आहे.
त्यामुळे आज मी अशा 39 जणांची शिक्षा माफ करत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा सुमारे 1500 लोकांची शिक्षा कमी करण्यात मी व्यग्र आहे. यातील काहींची शिक्षा कमी केली जाईल. अमेरिकेत अलीकडच्या काळात एका दिवसात दिलेली ही सर्वात मोठी माफी आहे.
खरं तर, डिसेंबर 2012 मध्ये, डॉ. मीरा सचदेवा यांना फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरल्यानंतर 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्यांच्यावर $82 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला होता.
बायडेन यांनी प्रथम 39 गुन्हेगारांची शिक्षा माफ केली जे हिंसक गुन्ह्यांमध्ये सहभागी नव्हते. त्यांनी चार भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची शिक्षा माफ केली आहे. मीरा सचदेवा, बाबूभाई पटेल, कृष्णा मोटे आणि विक्रम दत्ता अशी त्यांची नावे आहेत.
याआधी आपल्या अधिकाराचा वापर करून बायडेन यांनी आपल्या मुलाची शिक्षाही माफ केली होती. हंटर बायडेन यांना त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये माफी दिली होती. बायडेन यांचा मुलगा हंटर बिडेनवर करचुकवेगिरीपासून बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणे, सरकारी पैशांचा गैरवापर करणे आणि खोटी साक्ष देणे असे आरोप होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App