पवारांनी कोल्हापुरातून काढले अमित शाहांचे “संस्कार”; अमित शाहांनी मालेगावातून “एक्सपोज” केले पवारांचे “मार्केटिंग”!!

Sharad pawar

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत अमित शाहांवर कोल्हापुरातले “संस्कार” नाहीत असे शरसंधान साधले, त्यानंतर अमित शहा यांनी मालेगावातून पवारांचे पॉलिटिकल मार्केटिंग एक्स्पोज केले!! दोन दिग्गज नेत्यांमधील ही जुगलबंदी आज रंगली.

भाजपच्या शिर्डीतल्या महाअधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवारांचे दगा फटक्याचे राजकारण महाराष्ट्राच्या जनतेने 20 फूट जमिनीत गाडले, अशी भाषा वापरली होती. त्यावरून अमित शाह हे “सुसंस्कारित नेते” नसल्याचा “निष्कर्ष” शरद पवारांनी नंतर वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमध्ये काढला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील अमित शाह यांना प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला होता.

आज कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अमित शाह यांच्यावर शरसंधान साधले. अमित शाह हे गृहमंत्री पदासारख्या उच्च पदावर असून देखील टोकाची भूमिका घेणारी भाषा वापरतात. त्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर त्यांच्याच भाषेत दिले. अमित शहा यांच्यावर कोल्हापुरातले “संस्कार” दिसत नाहीत. ते कोल्हापूरमध्ये शिकले की नाही, हे मला माहिती नाही, असा टोला पवारांनी अमित शाह यांना हाणला.

अमित शाह यांनी मालेगावात येऊन शरद पवारांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांचे 46000 कोटी रुपयांचे टॅक्स कमी करण्याचे काम मोदी सरकारने केलं. पण पवार साहेब, आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात, त्यावेळी सहकार क्षेत्र आपल्याकडे होतं, त्यावेळी आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकारासाठी काय केलं??, याचा हिशेब महाराष्ट्राच्या जनतेला द्या. नुसतं स्वतःचं मार्केटिंग करून नेता बनून फिरणं सोपं आहे, जमिनीवर उभं राहून काम करणे गरजेचं असतं, असा हल्लाबोल यावेळी अमित शाह यांनी शरद पवारांवर केला.

लाल बहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. नरेंद्र मोदी यांनी जय विज्ञानचा नारा दिला. सहकाराच्या माध्यमातून चालवलं गेलं तर शेतीमध्ये निश्चित फायदा होतो. शेतकरी परंपरागत शेती करतो, अत्याधुनिक भूमी परीक्षण प्रयोगशाळा इथे तयार करण्यात आली आहे. पाण्याची पीए मात्रा किती आहे याचा अभ्यास देखील याठिकाणी केला जातो आहे. 1500 गिर गाई आहेत, त्यातून सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार होतील. यामुळे ऑरगॅनिक शेतीची सुरुवात देखील होईल. ऑरगॅनिक लॅबोरेटरी सुरू करा, भारत सरकार तुम्हाला मदत करेल असे मी शिवाजीराव यांना सांगितलं आहे.

सहकार मंत्रालयाने ऑरगॅनिक को ऑपरेटिव्ह लिमिटेड तयार केले आहे. या माध्यमातून येणारा फायदा थेट शेतकऱ्यांच्या अकाऊंटवर जाणार आहे. त्यासाठी लागणारे प्रमाणपत्र ही संस्था देणार आहे. आत्म निर्भरतेची सर्वात सुंदर व्याख्या सहकार आहे. त्यामुळे मोदींनी सहकार ते समृद्धी असा नारा दिला आहे. या संस्थेत 1 लाखांहून अधिक सदस्य आहेत इथे अत्यंत सुंदर ड्रिप व्यवस्था आहे. 80 % शेती इथे ड्रीपद्वारे होते, असं अमित शाह म्हणाले.

Sharad pawar and amit Shah targets each other again

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात