Sharad Pawar : शरद पवारांना पुन्हा ‘ट्रम्पेट’ निशाणीचा फटका; 9 मतदारसंघात पवारांच्या उमेदवारांपेक्षा अपक्षांना जास्त मते; लोकसभेची पुनरावृत्ती

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sharad Pawar विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला जनतेने नाकारल्याचे दिसून आले. सध्या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जात असून काही जागांवर ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवारांच्या पक्षाला फटका बसल्याचे समोर आले आहे. 9 मतदारसंघात ट्रम्पेट(पिपाणी) चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाल्याचे दिसून आले. ट्रम्पेटला मिळणारी मते शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली असती, तर या नऊ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले असते, असे बोलले जात आहे.Sharad Pawar

लोकसभा निवडणुकीतही सातारा तसेच इतर लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काही ठिकाणी तुतारी चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला जास्त मते मिळाली होती. त्याचीच प्रचिती यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही आली. शहापूर, बेलापूर, केज, परंडा, अणुशक्तीनगर, जिंतूर, घनसावंगी, आंबेगाव, पारनेर, या विधानसभा मतदासंघात शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे, त्यापेक्षा अधिक मते ट्रम्पेट (पिपाणी) हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळाली आहेत.



कोण-कोणत्या मतदारसंघात बसला फटका?

शहापूर येथे शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांचा 1 हजार 672 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेट चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला 3 हजार 892 मते मिळाली.

बेलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप नाईख यांना अवघ्या 377 मतांनी पराभव पत्करावा लागला. येथे ट्रम्पेटला 2 हजार 860 मते मिळाली.

केज मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे पृथ्वीराज साठे यांचा 2 हजार 687 मतांनी पराभव झाला. ट्रम्पेटला 3 हजार 559 मते मिळाली.

परंडा येथे राहुल मोटे यांचा 1 हजार 509 मतांनी पराभव झाला. ट्रम्पेटला 4 हजार 446 मते मिळाली.

अणुशक्तीनगर येथे अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आणि शरद पवार गटाचे उमदेवार फहाद अहमद यांचा 3 हजार 378 मतांनी पराभव झाला. तर येथे तुतारीला 4 हजार 075 मते मिळाली.

जिंतूर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे यांचा 4 हजार 516 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. तर तुतारी म्हणजेच ट्रम्पेटला 7 हजार 430 मते पडली.

घनसावंगीमध्ये माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा 2 हजार 309 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेट या चिन्हाला 4 हजार 830 मते मिळाली.

आंबेगाव येथे शरद पवार यांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांचा 1 हजार 523 मतांनी पराभव झाला. तर तुतारी म्हणजेच ट्रम्पेट चिन्ह असणाऱ्या उमेदवाराला 2 हजार 965 मते मिळाली.

पारनेर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाच्या आणि निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा 1 हजार 526 मतांनी पराभव झाला. येथे ट्रम्पेटला 3 हजार 582 मते मिळाली.

Sharad Pawar again hit by ‘trumpet’ target; Independents get more votes than Pawar’s candidates in 9 constituencies; Lok Sabha repeat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात