शंकर‌ अण्णा धोंडगेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; मराठवाड्यात पक्षाला बळकटी

Shankar Anna Dhondge

विशेष प्रतिनिधी

मुंबई : नांदेड जिल्ह्यातील लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी भगवा झेंडा हाती घेत आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Shankar Anna Dhondge

याप्रसंगी शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह दत्ता आनंदराव पवार, नीलमताई खेमनर, शिवराज धोंडगे, गोविंदराव भवर, मनोहर पटवारी, लक्ष्मणराव वंजे, अनिल फंड, बबनराव गवारे, मंचकराव बचाटे, दिलीप धोंडगे, भैय्यासाहेब पाटील, मारुती जाधव, अनिल यादव आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे हे आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम करणारे नेतृत्व आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी उभी केलेली संघटनात्मक ताकद मोठी आहे. अशा अनुभवी आणि लढाऊ नेतृत्वामुळे शिवसेनेची शेतकऱ्यांच्या हितासंदर्भातील भूमिका आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. शेतकरी सन्मान योजनेतून थेट मदत, पिक विमा सुलभता, नैसर्गिक आपत्तीतील अटी शिथिल केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेसह योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचाही निर्णय घेतला जाईल असे सांगताना शेतकरी सुखी झाला पाहिजे, आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास सुमारे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रा. रमेश बोरनारे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shankar Anna Dhondge joins Shinde’s Shiv Sena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात