विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाºया सिरम इन्स्टिट्युटनं लसींचा हाच पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील आघाडीच्या शॉट कायशा या कंपनीची ५० टक्के मालकी सिरम इन्स्टिट्युटनं खरेदी केले आहेत. त्यामुळे लस बनविण्यासाठी कच्चा माल मिळणे सोपे होणार आहे.Serum Institute will be self-sufficient in raw materials
सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातली माहिती दिली आहे. दोन्ही कंपन्यांकडून जारी करण्यात आलेले पत्रक अदर पूनावाला यांनी शेअर केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशातील लस उत्पादक उद्योगांसाठी कच्च्या मालाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं फार आवश्यक आहे.
हेच साध्य करण्यासाठी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं शॉट कायशामधील ५० टक्के समभाग खरेदी केले आहेत. भारतीय लस उद्योग विश्वासाठी औषध पॅकेजिंग उत्पादनांचा अखंड पुरवठा होणं यामुळे शक्य होणार आहे.शॉट कायशा कंपनीही फार्मा पॅकेजिंग क्षेत्रातली भारतामधील महत्त्वाची कंपनी आहे.
जर्मनीमधील काच उत्पादक कंपनी आणि कायशा ही भारतातील कंपनी यांच्या भागीदारीतून शॉट कायशा या कंपनीची निर्मिती झाली आहे. देशभरात सर्वाधिक २.५ बिलियन व्हायल्स प्रतिवर्षी ही कंपनी उत्पादित करते. या वर्षभरात तब्बल ३८० मिलियन व्हायल्सची विक्री करण्याचं लक्ष्य कंपनीने ठेवल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी हा आकडा ११३ मिलियन वायल्स इतका होता.
दोन्ही कंपन्यांनी कराराच्या एकूण रकमेचा आकडा जाहीर न करण्याचा निर्णय घेतल्याचं शॉट इंडियाच्या प्रतिनिधीने म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिरम इस्टिट्युट शॉट कायशाकडून औषधांच्या पॅकिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करत आहे. यामध्ये लसींच्या साठवणुकीसाठी लागणाऱ्या व्हायल्स आणि सिरींजचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App