ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली, पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू


विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल केले आहे. आज दुपारी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यामुळे तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णा हजारेंवर अँजिओप्लास्टी देखील झाली असून त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे असे समजते. त्यांची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. अण्णा हजारे यांचे अनुयायी त्यांची प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

Senior social activist Anna Hazare is undergoing treatment at Ruby Hospital in Pune

रुबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अवधूत बोदमवाड यांनी अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ते म्हणतात की त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले त्यामुळे लवकरच ते बरे होतील.


WATCH : भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ; अण्णा हजारे यांची लोकायुक्त कायद्याची हाक


अण्णा हजारे यांची प्रकृती खराब झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयांमध्ये फिजिओथेरपी हे घेत आहेत. अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच त्यांनी अण्णाच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली आहे. असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Senior social activist Anna Hazare is undergoing treatment at Ruby Hospital in Pune

 

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात