डबल गेमचा दुसरा अंक : अजितदादांविषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवत सुप्रिया सुळेंचा संजय राऊतांवर निशाणा!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार भाजपच्या सत्तेच्या वळचणीला घेऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधून शरद पवार हे डबल गेम खेळत असल्याचे चित्र होते. आता त्या डबल गेमचा दुसरा अंक सुरू झाला असून सुप्रिया सुळे देखील या डबल गेम मध्ये सामील झाल्या आहेत. अजित पवारांविषयी सॉफ्ट कॉर्नर दाखवत सुप्रिया सुळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.Second issue of double game: Supriya Sule targets Sanjay Raut by showing soft corner about Ajitdada!!

अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. त्यामधील अनेक संस्थांवर अजित पवार आहेत. यामुळे या संस्थांचे पुढे काय करायचे त्यावर चर्चेसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेत अजित पवार यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.



आम्ही नाती नेहमी जपली

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार आणि आमचे राजकीय मतभेद आहेत. परंतु आमच्यात मनभेद नाहीत. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांच्या काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नातीतर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती तयार झाली आहेत. पवार साहेबांचा गोतावळा मोठा आहे. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहे, पवार कुटुंबियांचे संस्कार आहे. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहे, संजय राऊत यांचे वक्तव्य हे बाळबोध आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सामनातून शरद पवार आणि अजित पवार यांचे डबल गेम एक्सपोज केल्यानंतर शरद पवारांनी त्यांना फटकारले होते. त्यानंतर ताबडतोब संजय राऊत यांनी आपली भूमिका बदलून शरद पवारांच्या बाजूने बोलायला सुरुवात केली आज ते अजित पवारांविरुद्ध जे बोलले, त्याचा सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला.

Second issue of double game: Supriya Sule targets Sanjay Raut by showing soft corner about Ajitdada!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात