Luna-25 Mission : रशियाची चांद्रमोहीम अयशस्वी, ‘लुना-25’ चंद्रावर कोसळले


रशियाने 11 ऑगस्ट रोजी लुना-25 लाँच केले होते.

विशेष प्रतिनिधी

मॉस्को :  रशियाने 50 वर्षांनंतर दुसऱ्यांदा चंद्र मोहीम सुरू केली होती, जी 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार होती. तथापि, Roscosmos च्या मते, Luna-25 स्टेशन चंद्रावर आदळले, ज्यामुळे मिशन अयशस्वी झाले. रशियाने 11 ऑगस्ट रोजी लुना-25 लाँच केले होते. Russias luna mission failed Luna 25 crashed on the moon

जर्मनीच्या DW न्यूजने रशियन स्पेस एजन्सी Roscosmos च्या हवाल्याने म्हटले आहे की, रशियाचे Luna-25 यान चंद्रावर कोसळले आहे. लूना-25 च्या लँडरवरील कॅमेऱ्यांनी पृथ्वीपासून चंद्राचे दूरवरचे फोटो आधीच घेतले होते. रॉसकॉसमॉसचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी जूनमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले की चंद्र मोहिमेमध्ये धोके आहेत. त्यांच्या यशाची शक्यता फक्त 70 टक्के आहे.

Luna-25 अंतराळयान 11 ऑगस्ट रोजी Soyuz 2.1B रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून सोडण्यात आले. त्याच दिवशी लूना-25 पृथ्वीच्या कक्षेतून चंद्रावर पाठवण्यात आले. 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2:27 वाजता हे यान चंद्राच्या 100 किमीच्या कक्षेत पोहोचले. 21 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील बोगुस्लाव्स्की विवराजवळ उतरणार होते.

रशियाने 47 वर्षांनंतर चंद्रावर पाठवली मोहीम

रशियाने 47 वर्षांनंतर चंद्रावर आपली मोहीम पाठवली आहे. याआधी 1976 मध्ये त्यांनी लुना-24 मिशन पाठवले होते. सुमारे 170 ग्रॅम चंद्राच्या धुळीसह लुना-24 सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले होते. आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तावर पोहोचल्या असून, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मिशन उतरण्याची ही पहिलीच वेळ ठरणार होती.

Russias luna mission failed Luna 25 crashed on the moon

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात