एवढंच नाहीतर आता कायदेशीर कारवाईची तयारीही करत आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मार्केट रेग्युलेटर SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांच्यावर आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग अहवालाचा मुद्दा अजूनही निकाली निघताना दिसत नाही. अलीकडेच काँग्रेस पक्षाने माधबी पुरी यांच्यावर काही आरोप केले होते. आता सेबी प्रमुख बुच यांनी यावर आपले स्पष्टीकरण मांडले आहे. या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे. त्यानी आपल्या गुंतवणुकी आणि नोकऱ्यांशी संबंधित सर्व माहिती सेबीला आधीच दिली होती.
माधबी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या आरोपांवर मौन सोडले आणि असे म्हटले की, हे मुद्दाम त्यांच्याविरुद्ध बोलले जात आहे. हा एक प्रकारचा फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे नाव न घेता ते म्हणाले की, या आरोपांना आधार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
Bhagyashree Atram : अजित पवार यांनी मला ज्ञान शिकवू नये, भाग्यश्री आत्राम यांनी थेटच सुनावले
काँग्रेसने माधबी पुरी बुच आणि धवल बुच यांच्यावर हितसंबंध आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की त्यांना आयसीआयसीआय ग्रुपसह इतर कंपन्यांकडून त्यांच्या सल्लागार कंपनी अगोरा ॲडव्हायझरीद्वारे उत्पन्न मिळाले आहे. माधबी पुरी बुच यांनी सांगितले की, आम्ही 2017 मध्येच सेबीला सर्व गुंतवणूक, मालमत्ता आणि कंपन्यांची माहिती दिली होती. असे आरोप आपली विश्वासार्हता डागाळतात आणि खोटे आहेत. त्यांचा उद्देश काही वेगळाच असतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App