अजित पवार म्हणाले की , निर्बंधांबाबत जर तुम्ही सरकारचं ऐकलं नाही तर याबाबत कठोर निर्णय घेण्यात येईल.’Schools are closed now so that children are not harmed’ – Ajit Pawar
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहराच्या स्थिती जाणून घेण्यासाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत दरम्यानशहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लहान मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पालकांना गंभीर इशारा दिला आहे.यावेळी पवार म्हणाले की , निर्बंधांबाबत जर तुम्ही सरकारचं ऐकलं नाही तर याबाबत कठोर निर्णय घेण्यात येईल.
पालक आपल्या लहान मुलांना सध्या हॉटेल्स किंवा मॉलमध्ये गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहेत.दरम्यान कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा अधिक धोका असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं याबाबत काही नियमावली जाहीर होईल का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं.
पुढे पवार म्हणाले, “मुख्यमत्र्यांनी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आपण सध्या शाळा बंद ठेवल्या आहेत. मुलांना त्रास होऊ नये यासाठी आपण या गोष्टी केल्या आहेत पण जर त्यांच्या पालकांना ऐकायचंच नसेल तर या आठवड्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही काय निर्मण घ्यायचा तो घेऊ”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App