एलन मस्क यांना भारतातील ३ राज्यांकडून ऑफर, तेलंगण, पंजाबपाठोपाठ महाराष्ट्रानेही दिले टेस्लाचा कारखाना उभारण्याचे आमंत्रण

Elon Musk gets invitations from 3 Indian states, Telangana, Punjab, Maharashtra to set up Tesla factory

Elon Musk : या आठवड्याच्या सुरुवातीला तेलंगणाच्या आमंत्रणानंतर आता पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू आणि महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून एलन मस्क यांना आपल्या राज्यात टेस्लाचे उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. Elon Musk gets invitations from 3 Indian states, Telangana, Punjab, Maharashtra to set up Tesla factory


प्रतिनिधी

मुंबई : या आठवड्याच्या सुरुवातीला तेलंगणाच्या आमंत्रणानंतर आता पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू आणि महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून एलन मस्क यांना आपल्या राज्यात टेस्लाचे उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांनी टेस्का सीईओ एलोन मस्क यांना आपापल्या राज्यात टेस्ला युनिट्स स्थापन करण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमधून टेस्लाच्या सीईओला हे आमंत्रण त्यांच्या ट्विटनंतर आले आहे, ज्यात म्हटले आहे की कंपनी भारतात आपले उत्पादन लॉन्च करण्यासाठी आव्हानांना तोंड देत आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून लिहिले की, मी एलन मस्क यांना पंजाबमध्ये आमंत्रित करतो. पंजाब मॉडेल लुधियानाला इलेक्ट्रिक वाहन आणि बॅटरी उद्योगाचे केंद्र बनवेल. पंजाब मॉडेल गुंतवणुकीसाठी कालबद्ध सिंगल विंडो क्लिअरन्स प्रदान करेल, ज्यामुळे पंजाबमध्ये नवीन तंत्रज्ञान, हरित नोकऱ्या आणि पर्यावरण संरक्षणासह शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा होईल.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क यांना महाराष्ट्रात कंपनीचे उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. मस्क यांना ट्विटरवर खुले आमंत्रण देताना पाटील यांनी त्यांना राज्यात टेस्ला कारसाठी उत्पादन युनिट सुरू करण्याचा विचार करण्यास सांगितले. त्यांनी ट्विटद्वारे लिहिले की हे भारतातील सर्वात प्रगतीशील राज्यांपैकी एक आहे. भारतात प्रस्थापित होण्यासाठी आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातून आवश्यक ते सर्व सहकार्य देऊ. आम्‍ही तुम्‍हाला तुमच्‍या उत्‍पादन युनिटची महाराष्‍ट्रात स्‍थापना करण्‍यासाठी आमंत्रित करतो.

यापूर्वी तेलंगणाचे मंत्री केटी रामाराव यांनी टेस्ला इंकच्या सीईओला त्यांच्या राज्यात युनिट स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले होते. ते म्हणाले की त्यांच्या सरकारला “आव्हानांवर काम करण्यासाठी टेस्लासोबत भागीदारी करण्यात आनंद होईल.” यूएस-आधारित इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलोन मस्क म्हणाले होते की हे उत्पादन भारतात लॉन्च करण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

खरे तर टेस्लाला भारत सरकारकडून विशेष सवलत हवी आहे. तीही कोणताही प्लांट न उभारता. इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात शुल्क कमी करण्याचीही मागणी आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्लाला प्रथम भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले होते, त्यानंतरच कोणत्याही कर सवलतीचा विचार केला जाऊ शकतो, असे निक्षून सांगितले आहे. सरकारच्या सूत्रांनी सांगितले होते की, ते कोणत्याही वाहन निर्मात्याला अशी सवलत देत नाहीत आणि टेस्लाला कर सवलती दिल्याने भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या इतर कंपन्यांना चांगला संदेश जाणार नाही.

Elon Musk gets invitations from 3 Indian states, Telangana, Punjab, Maharashtra to set up Tesla factory

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात