यावेळी कार्यकर्त्यांनी सातारा येथील पोवई नका इथे एकत्र येत पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो अंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही केली.Satara: BJP workers protest against Nana Patole at Powai Naka, demand Patole’s arrest
विशेष प्रतिनिधी
सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपने आक्रम पावित्रा घेतला आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली आहे. अशातच आज ( सोमवारी 24 जाने )भाजप कार्यकर्त्यांनी साताऱ्यात पोवई नाक्यावर नाना पटोले यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी त्यांच्या अटकेची मागणी केली.
नेमक प्रकरण काय आहे?
काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्यावेळी पटोले म्हणाले होते की , ‘ मी मोदींना मारू ही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो .’ त्यानंतर काल नाना पटोले यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.यावेळी ते म्हणाले की, ‘ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,’ असे आक्षेपार्ह वक्तव्य पटोले यांनी केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. आज भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने सातारा येथे अंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सातारा येथील पोवई नका इथे एकत्र येत पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो अंदोलन करत जोरदार घोषणाबाजीही केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App