मोदींवर वादग्रस्त वक्तव्य : नाना पटोलेंवरील अटकेच्या कारवाईचा बाॅल राज्यपालांच्या कोर्टात!!


प्रतिनिधी

मुंबई : “मी मोदीला मारू शकतो. मोदीला शिव्या देऊ शकतो. मोदी माझ्या विरोधात प्रचार करायला येतात,” असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर भाजपाचे नेते आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांची भेट घेतली आहे.Arrest of Nana Patole in Bal’s Governor’s Court!

नाना पटोले यांना उद्या बुधवार ता. 19 सकाळी अकरा वाजेपर्यंत अटक झाली नाही तर चर्चगेट जवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी उपोषण करण्याचा इशारा भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी दिला आहे.


नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना सुनावले


आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. आता याबाबत राज्यपाल नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. तसेच ते ठाकरे- पवार सरकारला कोणता आदेश देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवाय नाना पटोले यांनी आपली अडचण लक्षात घेऊन घुमजाव करत मी पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे, तर गावगुंड मोदीबद्दल बोलत होतो, असा दावा केला आहे. परंतु असा कोणताही मोदी नावाचा गावगुंड नसल्याचा खुलासा विविध वृत्तवाहिन्यांनी प्रत्यक्ष जेवनाळ या गावात जाऊन केला आहे. उलट या गावाची नाना पटोले यांच्यामुळे बदनामी झाली आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे असल्याचेही वृत्तवाहिन्यांनी आपल्या बातमीत म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर नाना पटले आता सर्व बाजूंनी कायदेशीरदृष्ट्या अडचणीत आले असून राज्यपाल आता ठाकरे – पवार सरकारला याबाबत कोणतेही निर्देश देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर या निर्देशानंतर ठाकरे – पवार सरकार कोणत्या प्रकारची कारवाई करते आणि काँग्रेस कडून त्यांना कोणत्या प्रकारचा अवरोध होतो, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Arrest of Nana Patole in Bal’s Governor’s Court!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात