विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या वहिनी सारंगी महाजन यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. एका चांगल्या मोठ्या राष्ट्रीय राजकारणातल्या पक्षात मी जाणार आहे. मात्र, भाजप हा मुंडे महाजनांचा प्रायव्हेट पक्ष आहे. त्या पक्षात मला घेतील असं वाटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. माझ्याबाबत अनेकदा निगेटिव्हिटी पसरवली गेली होती. मात्र काय काय घडलं आहे त्यावर वेब सीरिजही काढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.Sarangi Mahajan will enter politics and will also make a webseries about what happened
सारंगी महाजन या प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्या होत्या. ठाण्याच्या तुरुंगात प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी प्रवीण महाजन शिक्षा भोगत होते त्यांचा 2015 मध्ये मृत्यू झाला. एका न्यूजपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सारंगी महाजन यांनी म्हटले आहे की, मी दोन-तीन वेळा विचारून झाले आहे.
मात्र मला वाटत नाही मला तिथे प्रवेश मिळेल. 2008 पासून मी हे म्हणते आहे की हा मुंडे महाजनांचा प्रायव्हेट पक्ष आहे. त्यामुळे नात्यातले असो किंवा बाहेरचे असो कुणालाही यायचं असेल तर निर्णय यांचाच असतो. भाजपचा विचार बदलला तर चांगलंच आहे. मात्र तसं होईल असं वाटत नाही. मी एकटी महिला आहे. मी सारा फाऊंडेन नावाची संस्था सांभाळते आहे.
माझ्याबाबत अनेकदा निगेटिव्हिटी पसरवली गेली होती. मात्र काय काय घडलं आहे त्यावर वेब सीरिजही काढणार आहे. मी माझे आत्मचरित्र लिहिलं आहे त्यावर ही वेब सीरिज आधारित असणार आहे.सारंगी महाजन म्हणाल्या, उस्मानाबादच्या जमिनीच्या वादात मला धमक्या दिल्या गेल्या होत्या. पाच वाटण्या करा त्यातली एक मागणी माझी आहे.
आमची वडिलोपार्जित जागा होती. 2004 मध्ये प्रमोद महाजन यांनी तपस्वी ट्रस्टला दान केली असं दाखवलं आहे. मात्र 100 रूपयांच्या स्टँपपेपरवर दाखवलं जातं का? हा प्रश्न आहे. एकाही बहीण भावाची संमती नसताना तिथे संस्था उभ्या केल्या गेल्या. घरच्यांना याबाबत काहीही माहित नव्हतं. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर माझ्या दिरांना अध्यक्षपद हवं होतं ते त्या ट्रस्टने दिलं नाही.
मात्र त्यावेळी काही चॅनल्सनी बातम्या चालवल्या होत्या. तो सगळा वाद सगळा समोर आला होता. त्याबाबत समझोता झाला, पण त्याप्रकरणी मला धोका देण्यात आला. मला त्रास देण्याच्या उद्देशातून अनेक गोष्ट घडली. माझे दीर एक प्यादं होतं, अख्ख्या उस्मानाबादमध्ये एका महिलेला त्रास देत आहेत त्यामुळे महाजनांची काय इमेज आहे ते कुणी जाऊन विचारू शकता. अजूनही ते भ्रमात जगत आहेत, त्यानी यातून बाहेर आलं पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App