शुबमन गिलबरोबरचा डीपफेक फोटो, बनावट अकाऊंटमुळे सारा तेंडुलकर संतापली!

विशेष प्रतिनिधी

पुणे : विश्वचषक 2023 अनेक कारणांनी गाजला! आपल्या खेळाडूंनी केलेली या मालिकेतकेलेली जोरदार कामगिरी, विराट कोहली मोहम्मद शमी यासारख्या अनेक खेळाडूंनी बनवलेले वेगवेगळे रेकॉर्ड आणि सारा तेंडुलकर आणि खेळाडू शुबमन गिल यांच्यातील रिलेशनशिप ! मात्र या सगळ्यात डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका सारा तेंडुलकर हिला यादरम्यान बसला . Sara Tendulkar the fake technology news

रश्मिका मंदाना, कतरिना कैफनंतर सारा देखील या तंत्रज्ञानाची शिकार ठरली.शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला  होता. मुळात हा फोटो साराने तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरबरोबर काढला होता. याबाबत साराने अधिकृतरित्या कोणतेही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आज इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याप्रकरणी तिने भाष्य केलं आहे.

सारा तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “आपल्या सुख-दु:खांना वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे. अशाप्रकारच्या फसवणुकीमुळे आपण वास्तवापासून दूर आभासी जगाकडे जात आहोत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

सारा पुढे लिहिते, “माझा एक डीपफेक फोटो मध्यंतरी व्हायरल करण्यात आला होता. एक्सवर (ट्विटर) माझ्या नावाने एक अकाऊंट उघडण्यात आलं आहे. ज्याच्या बायोमध्ये हे अकाऊंट बनावट (पॅरोडी ) असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. तरीही माझ्या नावाचा वापर करून या अकाऊंटवरून विविध फोटो शेअर करण्यात येत आहेत. माझं एक्सवर अधिकृतपणे कोणतंही अकाऊंट नाही.”

Sara Tendulkar the fake technology news

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात