विशेष प्रतिनिधी
बीड : Santosh Deshmukh मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम. एल. ताहलियानी यांची एकसदस्यीय चौकशी समिती शासनाने नियुक्त केली आहे. या समितीच्या चौकशी फेऱ्यात बीड पोलिसही आले आहेत. हे प्रकरण बीड पोलिसांनी कशी प्रकारे हाताळले याची चौकशी समितीकडून केली जाणार आहे.Santosh Deshmukh
दोन दिवसांपूर्वी निवृत्त न्या. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती झाली आहे. संपूर्ण घटनाक्रम, त्याची कारणे आणि परिणाम याचा अभ्यास, या घटनेसाठी कोणती व्यक्ती, संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जबाबदार होती याची तपासणी, कायदा, सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचे नियोजन योग्य होते का, परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावले योग्य होती का, या मुद्द्यांवर जबाबदारी निश्चित करणे, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाय सूचवणे या मुद्द्यांवर समिती चौकशी करणार आहे.
कागदपत्रे जप्तीचा अधिकार
समितीला कोणत्याही जागेत, इमारतीत प्रवेश, कुणालाही चौकशीला बोलावणे, कोणतेही कागदपत्रे जप्त करण्याचा अधिकार समितीला असेल, बीड हे समितीचे मुख्यालय असेल. समितीसाठी मनुष्यबळ, वाहन, भत्ते याबाबत स्वतंत्र आदेश काढला जाणार आहे. तीन ते सहा महिन्यांत समिती अहवाल देईल, असेही सांगण्यात आले आहे. ६ आरोपींना आज केज न्यायालयात हजर करणार: हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे यांना शनिवारी केजच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
वाल्मीक दिंडोरी आश्रमात लपला होता- तृप्ती देसाई
२ कोटींच्या खंडणी प्रकरणात पोलिस वाल्मीक कराडचा शोध घेत होते तेव्हा तो आपला सहकारी विष्णू चाटेसह नाशिकच्या दिंडोरी येथील आश्रमात लपल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. दिंडोरी येथील आश्रमात वाल्मीक कराड व विष्णू चाटे १५ व १६ डिसेंबर रोजी मुक्कामाला होते. त्या वेळी खंडणी प्रकरणात पोलिस त्यांचा शोध घेत होते. ते दोन दिवस आश्रमात राहिल्यानंतर १७ डिसेंबर रोजी पुढे प्रवासाला निघून गेले.
दोन कोटी खंडणी प्रकरण; जामिनावर आज सुनावणी
दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडने न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्यावर शनिवारी केज न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसआयटीने आपले म्हणणे नोंदवले असून कराडला जामीन देऊ नये, तो पुरावा नष्ट करू शकतो, असे न्यायालयाला सांगितले आहे.
वाल्मीक कराडची परदेशात संपत्ती असल्याचा संशय
कराडची परदेशात संपत्ती आहे का, या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी त्याला कोठडी मिळाली होती. त्या अनुषंगाने एसआयटी चौकशी करत आहे. अद्याप याबाबत खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याची परदेशात संपत्ती असावी अशी शंका यंत्रणेला आहे. त्याचा एक सहायकही एसआयटीच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App