Mohit Kamboj : शिवसेना भवनात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले. या आरोपांना आता मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांनाच उलट प्रतिप्रश्न केले आहेत. Sanjay Raut With whom is your allegiance Thackeray or Pawar? Mohit Kamboj retaliation against Raut
प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना भवनात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज, किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप केले. या आरोपांना आता मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊतांनाच उलट प्रतिप्रश्न केले आहेत.
पत्रकार परिषदेत मोहित कंबोज म्हणाले की, मी प्रत्येक आरोपांचं उत्तर देणार आहे. बड्या बड्या नेत्यांची नावं राऊत साहेबांनी घेतली. मोदींपासून सुरू होतात फडणवीसांपर्यंत येतात. मागच्या पाच महिन्यांपासून महाराष्ट्राचं शासन- प्रशासन मिळून माझ्यासारख्या 37 वर्षांच्या मुलाशी लढून जिंकू शकलेलं नाही. सकाळी सकाही पत्रकार परिषद घेणे, दबाव बनवणे, ट्वीटर व अनेक माध्यमांतून धमकी देणे असे प्रकार सुरू आहेत. परंतु तुम्ही पाहिलं असेल की ज्या प्रमाणे नवाब भाई तोंडावर पडले ते. राऊत साहेबांनी सुरुवात केली की, मोहित कंबोज नावाचा मुलगा आहे ज्याला ते ओळखत नाहीत. यावर कंबोज यांनी राऊतांसोबतचा 2017चा फोटो दाखवला आणि म्हणाले की, मागच्या अनेक वर्षांपासून मी त्यांना ओळखतो. एवढंच नाही तर त्यांना जेव्हा जेव्हा आर्थिक अडचणी आल्या मी त्यांना मित्र म्हणून मदत केली आहे.
https://t.co/bAqpxHSj3R — Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar ) (@mohitbharatiya_) February 15, 2022
https://t.co/bAqpxHSj3R
— Mohit Kamboj Bharatiya ( Modi Ka Parivar ) (@mohitbharatiya_) February 15, 2022
कंबोज पुढे म्हणाले की, राऊत साहेबांनी आज मला फडणवीसांचं ब्लू हेड बॉय म्हटले याचा मला अभिमान आहे. पण मला एक सांगा राऊत साहेब तुम्ही ठाकरेंचं ब्लू हेड बॉय आहात की पवारांचे? आमची निष्ठा तर एका व्यक्तीसोबत एका पक्षासोबत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
कंबोज म्हणाले की, राऊत साहेब शासन प्रशासन तुमच्याजवळ आहे. तुम्ही अभ्यास करत जा. तुम्ही जो गुरू आशिषचा आरोप केला आहे की, दीड लाख स्क्वेअर फुटांची जागा मुंबईत आहे तरी का? तुम्हीसुद्धा मियाँ नवाब यांच्यासारखी हर्बल वनस्पती खाऊन प्रेस घेऊ लागले का? माझ्या कंपनीने 2010 मध्ये ज्यांनी म्हाडामध्ये स्कॅम केला त्यांच्या कडून खरेदी केली होती. ते माझे पैसे बुडाले. त्याची एफआयआरसुद्धा माझ्याकडे आहे. त्या जागेवर आजपर्यंतही डेव्हलपमेंट झाली नाही. तुम्हाला काय सांगायचं की, मी माझ्यासोबतच स्कॅम केलं. तुम्हाला काही विषयांची माहिती नाही, फक्त आरोप करत आहात. त्यांनी असंही म्हटलं की, पैसे कुठून येतात? मी त्यांना जाहीर आव्हान देतो की त्यांना जी चौकशी करायची आहे, ती करा, मी तयार आहे.
कंबोज पुढे म्हणाले की, राऊत आणि ग्रँड हयात हॉटेलचा काय संबंध आहे? राजकुमार गुप्ता आणि वंदना गुप्ता यांच्यावर देशातील सर्वात मोठं स्मगलिंग रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. त्यांच्याशी राऊत यांचा काय संबंध आहे? हे त्यांनी सांगावं.
Sanjay Raut With whom is your allegiance Thackeray or Pawar? Mohit Kamboj retaliation against Raut
संबंधित बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App