फडणवीसांच्या काळात 25000 कोटींचा महाआयटी घोटाळा झाला, तर तेव्हा शिवसेनेचे मंत्री काय करत होते??


शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत 25000 कोटींचा आयटी घोटाळा झाल्याचा आरोप आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.If there was a MahaIT scam of Rs 25000 crore during Fadnavis, then what was the Shiv Sena minister doing then

संजय राऊत यांच्या शेजारी त्यावेळी दिवाकर रावते हे बसले होते. शिवसेनेचे हे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री होते. याखेरीज एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री फडणवीसांचे सहकारी होते. हे सगळे शिवसेनेचे मंत्री 25000 कोटींचा आयटी घोटाळा होताना नेमके काय करत होते?, असा सवाल आता सोशल मीडियातून करण्यात येत आहे.



या तिन्ही वरिष्ठ मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती होती. सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खाते होते, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते होते. तसेच सध्या शिवसेनेत नावडते असलेले रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते. शिवसेनेचे हे वरिष्ठ नेते फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे मंत्री होते. मग ते 25000 कोटी रुपयांचा आयटी घोटाळा होत असताना गप्प का बसले??, त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध आवाज का उठवला नाही??, त्यावेळी पत्रकार परिषद का घेतली नाही??, असे सवालही आता सोशल मीडियातून करण्यात येत आहेत.

त्याचबरोबर आज संजय राऊत यांनी दिवाकर रावते यांची ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांना आपल्या पत्रकार परिषदेत शेजारी बसवून घेतले होते. परंतु पत्रकार परिषदेत ते स्वतः एकटेच बोलले. दिवाकर रावते काहीही बोलले नाहीत. त्याचबरोबर ज्यांच्यावर तब्बल 900 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचा आरोप आहे, ते माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांना देखील पत्रकार परिषदेत बोलण्याची संधी देण्यात आली नाही. या दोन्ही नेत्यांचा उल्लेख संजय राऊत यांनी आवर्जून केला. परंतु या दोन्ही नेत्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही? की ते स्वतःहून बोलले नाहीत? हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात राहिला आहे.

इतकेच काय पण फक्त संजय राऊत यांच्यावरच आरोप आणि ईडीच्या चौकशीचा फेरा आलेला नाही, तर अनिल परब, भावना गवळी, रवींद्र वायकर यांच्यावरही ईडीच्या चौकशीचा फेरा आहे. मात्र हे तीनही महत्त्वाचे नेते आजच्या पत्रकार परिषदेला हजर नव्हते. यातून नेमका राजकीय अर्थ काय काढायचा??, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

याचा अर्थ फक्त संजय राऊत यांच्या वरील आरोपांचे निराकरण करण्यासाठी म्हणजे आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेण्याची संधी देण्यात आली का?? आणि बाकीच्या शिवसैनिकांना अथवा शिवसेनेच्या नेत्यांना शिवसेना भवन पत्रकार परिषदेसाठी उपलब्ध होऊ शकेल का?? असे खोचक सवालही आता उपस्थित करण्यात येत आहेत.

If there was a MahaIT scam of Rs 25000 crore during Fadnavis, then what was the Shiv Sena minister doing then

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात