विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या, तर युवक काँग्रेसने त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा करतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ही जशी राजकीय विसंगती दिसून आली, तशीच विसंगती खुद्द शिवसेनेने दिसून आली आहे. Sanjay Raut praises Modi
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच वेळी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकेचा भडिमार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता आज देशात नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्थैर्याला देश प्रगतीपथावर आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
तर सामनाच्या अग्रलेखातून भाजपचा नेत्यांवर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. स्वतःच्या बाथरूममध्ये घुसावे तसेच भाजपचे नेते रोज ईडीच्या कार्यालयात जाऊन “मोकळे” होत आहेत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्याच वेळी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर खोटेनाटे आरोप लावण्याचाही आरोप भाजपवर लावून घेण्यात आला आहे. अभिनेता सोनू सूद याच्यावर आर्थिक बाबींसंदर्भात चौकशी लावली त्यावरून सामनात अग्रलेख लिहून भाजपला घेरण्याचा प्रयत्न झाला आहे.
एकीकडे संजय राऊत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची तारीफ करण्यात आघाडीवर आहेत. त्याच वेळी सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी भाजपवर टीकेचा बेछूट गोळीबार करून घेतला आहे. ही शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील नव्हे, तर स्वतः संजय राऊत यांच्यातलीच राजकीय विसंगती उघड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App