विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक विधान केले होते. यावर निशाणा साधून संजय राऊत यांनी फडणवीस यांनी केलेल्या या विधानावर खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की मला आजही वाटते की मी मुख्यमंत्री आहे. मी घरात एकही दिवस न थांबता जनतेची सेवा केली व जनतेने मला असे कधी जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाही.
Sanjay Raut and Sharad Pawar reaction on Devendra Fadnavis CM statement
काय म्हणाले संजय राऊत?
‘अजूनही यौवनात मी’ या नाटकातील एका संवादाचा संदर्भ देऊन संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांना वाटते की, अजूनही यौवनात मी. म्हणजेच ते अजूनही मुख्यमंत्री आहेत. दिल्लीत गेल्यावर आम्हालाही कधी कधी पंतप्रधान झाल्यासारखे वाटते.
‘शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू विडाच उचललाय!’, गोपीचंद पडळकरांची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका
शरद पवार यांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनीही फडणवीस यांच्या या विधानावर आपली खोचक प्रतिक्रिया दिली. मी फडणवीसांचं सगळ्यात आधी अभिनंदन करतो असं म्हणत त्यांनी शब्दांचा मारा केला. ते पुढे म्हणाले की त्यांची सत्ता गेल्याची वेदना किती सखोल आहे हे यातून कळाले. मी चार वर्ष मुख्यमंत्री होतो पण मला लक्षात राहिलं नाही. त्यांना पाच वर्षांत सत्तेमध्ये राहिल्यानंतर हे लक्षात राहिले आणि ही चांगली गोष्ट आहे. सत्ता ही येते आणि जाते त्याचा फारसा विचार करायचा नाही असा सल्ला पवार यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App