विशेष प्रतिनिधी
नाशिक : संजय राऊत आणि रोहित पवारांच्या आरोपांमधले आकडे फुगले, 4 – 5 डिजिटच्या कोटींमध्ये जाऊन पोहोचले!! Sanjay Raut and rohit pawar targets shinde fadnavis pawar government over corruption
संजय राऊत यांनी कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिशेने भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाच्या फैरी झाडल्या. एकनाथ शिंदे नाशिक मध्ये हेलिकॉप्टरमधून बॅगा घेऊन आले. शिंदे फक्त दोन तासांसाठी नाशिकमध्ये आले होते. एका हॉटेलवर जाऊन ते 12 – 13 कोटी रुपये वाटून गेले, असा आरोप राऊत यांनी सुरुवातीला केला होता.
त्यानंतर त्यांनी नाशिक मधल्या जमिनीचा घोटाळा बाहेर काढून त्याचा 800 कोटींचा आकडा सांगितला. त्यांनी नाशिक मधल्या दोन-तीन बिल्डरची नावे घेतली. त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना 325 कोटी रुपयांचा लाभ झाल्याचा दावा राऊत यांनी केला. संजय राऊत यांचे आरोप एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय शिरसाट यांनी फेटाळून लावले.
त्यानंतर आज रोहित पवार नाशिक मध्ये आले. त्यांनी शिंदे – फडणवीस – पवार सरकारवर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 2000 कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला. पण एवढाच आरोप करून ते थांबले नाहीत. त्यापुढे जाऊन शिंदे – फडणवीस – पवार सरकारवर त्यांनी 25000 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केला. या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रात इंडी आघाडीचे सरकार आल्यावर आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही करू, असे रोहित पवारांनी जाहीर केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App