देशातील वाईट प्रवृत्तीचा समीर वानखेडे नाश करत आहेत, असा काही लोकांचे म्हणणे असून, लोकांनी समीर वानखेडे यांच्या या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.”Sameer Wankhede, you go ahead, we are with you”, people took to the streets in support of Wankhede
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टीत धाड टाकत समीर वानखेडे यांनी अनेक बड्या हस्तींना अटक केली आहे . त्यामुळे ते देशभरात चर्चेत आहेत. या ड्रग्स पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सुद्धा अटक केली आहे.
अमली पदार्थाच्या विरोधात एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी मोहिम उघडली असून, बॉलिवूड, कॉर्पोरेट, व्यावसायिक आदी क्षेत्रातील लोकांची सध्या चौकशी सुरु आहे, त्यामुळं देशातील वाईट प्रवृत्तीचा नाश करत आहेत, असा काही लोकांचे म्हणणे असून, लोकांनी समीर वानखेडे यांच्या या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून एनसीबी, समीर वानखेडे नवाब मलिक आणि राज्य सरकार हे ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच नवाब मलिक वारंवार समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. यामुळं समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता रस्त्यावर उतरले आहेत.
सांगली येथे समीर वानखेडेच्या समर्थनार्थ ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ हि संघटना रस्त्यावर उतरली असून, त्यांच्या फोटोवर फुलांचा वर्षाव करत, “समीर वानखेडे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देण्यात आल्या.
तसेच सोशल मीडियावर वानखेडे यांच्या पाठिंबासाठी ट्रेंड सुद्धा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान हे करत असताना, समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती, म्हणून लोक समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ आता रस्त्यावर उतरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App