Sambhaji Raje : महाविकास – महायुतीच्या टकरीत संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीसाठी भेटीगाठी; बच्चू कडूंची वेटिंगची रणनीती!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : sambhaji raje महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या राजकीय टकरीत उरलेल्या राजकीय स्पेस मध्ये तिसऱ्या आघाडीसाठी माजी खासदार संभाजी राजे यांनी प्रयत्न चालविले असून त्या दृष्टीनेच त्यांनी भेटीगाठींचा सिलसिला आज पुढे सुरू ठेवला. त्यांनी आज प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांची भेट घेतली परंतु बच्चू कडू यांनी त्यांना 15 दिवस वेटिंग वर ठेवले. Sambhaji raje trying for 3 rd front, bacchu kadu in waiting mode

लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे यांनी आपले वडील कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा जोरदार प्रचार केला. ते काँग्रेसच्या तिकिटावर खासदार बनल्यानंतर मात्र संभाजीराजे काँग्रेस पासून दूर होत पुन्हा स्वराज्य संघटनेचे पाईक बनले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न चालविले. त्यांनी यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी तिसऱ्या आघाडी विषयी चर्चा केली. आघाडीची चर्चा पुढे सरकली. मात्र त्या चर्चांमधून प्रत्यक्ष तिसरी आघाडी जन्माला आली नाही.



संभाजी राजे यांनी आज बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर एकमत झाले परंतु चार-पाच मुद्द्यांवर अजून मतभेद असल्याचे संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढच्या बैठकांमध्ये हे मतभेद दूर करू असे ते म्हणाले. तिसऱ्या आघाडीत सामील व्हायचे की नाही, हे 15 दिवसांत सांगू, असे बच्चू कडू यांनी संभाजीराजे यांना सांगितले.

बाकी स्वराज्य संघटनेला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आणि महाराष्ट्रातल्या संतांचा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे, असे संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा सांगितले.

राजकोट किल्ल्यावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन उठाबशा काढाव्यात. त्यांच्यानंतर आम्हीही उठाबशा काढू असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

Sambhaji Raje trying for 3 rd front, bacchu kadu in waiting mode

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात