विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये आपले वडील शाहू महाराज यांचा कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्ष संघटना बाजूला ठेवली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्याच पक्ष संघटनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर एक निवडणूक चिन्हही बहाल केले आहे. स्वतः संभाजीराजे यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून यासंदर्भात माहिती दिली. Sambhaji Raje New party Swarajya paksha
संभाजीराजे यांनी 2022 मध्येच स्वराज्य पक्ष संघटना स्थापन केली होती. सुरुवातीला त्या पक्षाद्वारेच लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा इरादा होता. परंतु त्यांचे वडील शाहू महाराजांनी कोल्हापुरातून काँग्रेसचे तिकीट घेतले. त्यामुळे त्यांचा प्रचार करण्यासाठी संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणुकीपुरती स्वराज्य पक्ष संघटना गुंडाळून बाजूला ठेवली होती. संभाजीराजे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहू महाराजांचा जोरदार प्रचार केला. काँग्रेससाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला.
Congress : मराठी माध्यमांमधून पवार + ठाकरेंना सहानुभूतीचे चित्र; प्रत्यक्षात काँग्रेसकडेच इच्छुकांचा मोठा ओढा!!
लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांचा विजय झाला त्यानंतर मात्र संभाजीराजे यांनी काँग्रेसची कास सोडून दिली. पुन्हा एकदा स्वराज्य पक्ष संघटनेची कास धरली. ते परिवर्तन महाशक्ती नावाच्या तिसऱ्या आघाडीत सामील झाले. त्यानंतर आता त्यांच्या स्वराज्य पक्ष संघटनेला निवडणूक आयोगाने “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने मान्यता देऊन “सप्त किरणांसह पेनाचे निब” हे चिन्ह बहाल केले. त्यामुळे संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष तिसऱ्या आघाडीत “सप्त किरणांसह पेनाचे निब” या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more