मराठी अभिनेते किरण माने यांची मुलगी झाली हो मालिकेतून हकालपट्टी केल्यानंतर वाद सुरूच आहेत. स्टार प्रवाहच्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर जाऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेवर पोलीस आल्याने हे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले.Sambhaji Brigade involved In the case of Kiran Mane, tried to stop the shooting of Mulgi Jhali Ho
प्रतिनिधी
सातारा : मराठी अभिनेते किरण माने यांची मुलगी झाली हो मालिकेतून हकालपट्टी केल्यानंतर वाद सुरूच आहेत. स्टार प्रवाहच्या ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर जाऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरण बंद पाडण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेवर पोलीस आल्याने हे चित्रीकरण पुन्हा सुरू झाले.
साताऱ्यातल्या गुळुंब येथे ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. मालिकेच्या सेटवर आज संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी शूटिंग बंद करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. यानंतर शूटिंग पुन्हा सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
किरण माने यांनी सोशल मीडियावर राजकीय कॉमेंट केल्यामुळे आपल्याला मालिकेतून हटवण्यात आल्याचा आरोप केला आहे. परंतु स्टार प्रवाह वाहिनीने हे आरोप फेटाळले आहेत. माने यांचे मालिकेतील सहकलाकारांशी विशेषत महिला कलाकारांशी गैरवर्तन होत असल्यानेच त्यांना काढून टाकण्यात आल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे.
यावरून दोन गट पडले आहेत. मालिकेतील काही कलाकारांनी माने यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत, तर काही कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगानेही यावरून स्टार प्रवाह वाहिनीला नोटीस बजावली आहे. त्यामुळं हा वाद वाढला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App