नगरपंचायत निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर घसरलेल्या शिवसेनेचे सुरू आहे “सोंगाड्या”, “चिवा”, “चंपा”!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षांवर मात करत पहिला क्रमांक पटकावला. मात्र, या निकालातून एक बाब स्पष्ट झाली ती म्हणजे महाविकास आघाडीतला सर्वात मोठा घटक पक्ष शिवसेना राज्यामध्ये चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शिवसेनेला मागे टाकले. शिवसेनेकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद असूनही नगरपंचायत निवडणूक निकाल शिवसेनेची घसरण झाल्याचे स्पष्ट झाले. निवडणुकीत हार – जीत होत असते. परंतु, निवडणूक निकालानंतर सर्वसामान्यपणे मागे पडलेले पक्ष आम्ही आत्मपरीक्षण करू, झालेल्या चुका दुरुस्त करून उणिवा दूर करू, अशी भाषा वापरत असतात.Fourth in Nagar Panchayat elections

पण कालच एवढी मोठी घसरण झालेली असताना शिवसेनेचे आज काय चालू आहे??… तर शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत गोव्यात “नटसम्राट”, “सोंगाड्या” या शब्दांची आतषबाजी करताना दिसले आहेत, तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर “चिवा”, “चंपा” या शब्दांच्या फैरी झाडताना दिसत आहेत.



एकीकडे महाराष्ट्रात घसरण आणि गोव्यात अजून उमेदवार यादीचा पत्ता नाही. भाजपची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर तिथून निसटलेल्या किंवा डावललेल्या नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न, अशा स्थितीत शिवसेनेचे नेते फक्त तोंडी फैरी झाडून आपले समाधान आणि माध्यमांची करमणूक करत आहेत.

राणीच्या बागेत 106 कोटी रुपयांचा निविदा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी केला आहे. परदेशातून ब्लॅक पॅंथर, चिपांझी असे प्राणी आणण्यासाठी निविदा काढण्यात महापालिकेने घोटाळा केल्याचा त्यांचा आरोप आहे. त्याला प्रत्युत्तर काय तर, आपण राणीच्या बागेतल्या हत्तीच्या पिल्लाचे नाव “चिवा” आणि माकडाचे नाव “चंपा” ठेवू. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पेंग्विन नामकरणाचा मुद्दा उपस्थित केला. पेंग्विनचे नाव “ऑस्कर” ठेवले. तेव्हा मराठी नाव सुचले नाही, असे टीकास्त्र चित्रा वाघ यांनी सोडले होते. त्याला उत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी चित्रा वाघ यांच्या नावाचा अपभ्रंश करून “चिवा” आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावाचा अपभ्रंश करून “चंपा” अशी नावे हत्तीच्या पिल्लाला आणि माकडाला ठेऊ, असे प्रत्युत्तर दिले.

एकूणच शिवसेनेची महाराष्ट्रात घसरण फक्त निवडणुकीपुरती नाही तर आता शाब्दिक खेळी करण्यातही झाली आहे हेच यातून दिसून येते.

Fourth in Nagar Panchayat elections

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!