प्रतिनिधी
मुंबई – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फोन घेत नाहीत, ही तक्रार फक्त देवेंद्र फडणवीस किंवा शिवसेनेच्या आमदारांचीच नाही, तर ठाकरे – पवार सरकारला बाहेरू पाठिंबा देणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींची देखील आहे. उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे भेट देत नाहीत आणि फोनही घेत नाहीत, अशी तक्रार आझमींनी केली आहे. samajwadi party leader abu asim azmi targets CM uddhav thackderay and aditya thackeray
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भिवंडीत त्यांच्या मनाला येईल तसे अधिकारी बदलतात. पण आम्ही जनतेच्या प्रश्नावर भेट मागतो तर ते फोन देखील उचलत नाहीत, अशी तक्रार अबू आझमींनी केली आहे. आयबीँएन लोकमतने ही बातमी दिली आहे.
ठाकरे – पवार सरकारचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टीकोन चांगला नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी करीत होते. पण आता स्वतःचे सरकार आले तरी ते काही करीत नाहीत, अशी खंतही आझमींनी बोलून दाखवली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नाहीत, तर आदित्य ठाकरे हे देखील जनतेच्या प्रश्नावर भेट देत नाही. गणपती उत्सवाला वेळ आहे तरी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. पण बकरी ईद जवळ आली असतानाही नियमावली जाहीर करत नाही, अशी नाराजी अबू आझमींनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App