Sajjad Nomani आधी फतवा काढून भाजप विरोधात डरकाळी; पण महाराष्ट्राच्या निकालानंतर मौलाना सज्जाद नोमानींना माफीची उपरती!!

Sajjad Nomani

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आधी फतवा काढून भाजप विरोधात डरकाळी फोडली, पण महाराष्ट्राच्या निकालानंतर मौलाना सज्जाद नोमानींना माफीची उपराती झाली.

याची कहाणी अशी :

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आणि इस्लामी विद्वान मौलाना खालील उर रहमान सज्जाद नोमानी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सुरुवातीला मनोज जरांगे यांची भेट घेऊन मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन तयार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान त्यांनी व्हिडिओ जारी करून मुस्लिमांना भाजप विरोधात मतदान करायचे आवाहन करत व्होट जिहादचे ऐलान केले. हे व्होट जिहादचे ऐलान कमी पडले म्हणून की काय, त्यांनी त्याच व्हिडिओतून जे मुसलमान भाजपला मतदान करतील त्यांचा हुक्का पाणी बंद करण्याचे आव्हान दिले. या विरोधात अनेक संघटनांनी पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या. त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली.

Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया

दरम्यानच्या काळात महाराष्ट्र विधानसभेचे निकाल आले. त्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव आणि महायुतीचा प्रचंड विजय झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मौलाना सज्जाद नोमानी यांना माफी मागण्याची उपरती झाली. पण ही महायुतीच्या विजयातून किंवा महाविकास आघाडीतून आघाडीच्या पराभवातून होण्यापेक्षा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याचे भीतीतून निर्माण झाल्याचे उघड दिसले. कारण एकदा का मौलाना सज्जाद नोमानी कायद्याच्या कचाट्यात अडकले की त्यातून मोदी सरकारच्या काळात तरी सुटणे कठीण आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बिनशर्त माफी मागण्याचे पत्रक जारी केले.

Apology to Maulana Sajjad Nomani

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात