विशेष प्रतिनिधी
जळगाव : इंडियन मिनिस्ट्री अॉफ डिफेन्स अंतर्गत निमास संस्थेच्या विविध कोर्स मधील ” व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग” हा कोर्स करणारी भारतात सर्वात कमी वयाची पाचोऱ्यातील सहीष्णा सोमवंशी ही पहिली कन्या ठरली आहे. Sahishna somvanshi of paachora Became the first little girl to do the “White Water River Rafting” course
भारताच्या डीरांग अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सिमेवर भारतीय सैन्य दलाने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनींग ए लीड स्पोर्ट्स (निमास) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या ठिकाणी भारतातून विविध राज्यांतील महिला आणि पुरुष अकरा दिवसाचा कॅम्प करण्यासाठी जातात. यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोग घेण्यासाठी भारतीय लोक सक्षम असावे म्हणून हा कॅम्प इंडिया मिनिस्ट्री अॉफ डेफेन्सने बनवला असून यात माउंटनींग, स्कुबा डायव्हिंग, पॅरा लायडींग, बायकींग, व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग आदी कोर्स केले जातात.
येथे शुन्य तापमान असुन हा खडतर कोर्स पूर्ण करावा लागतो. टेन्टमध्ये राहणे सैन्याप्रमाणे जेवण घेणे अतिशय थंड पाण्यात राफ्टिंग करावे लागते. यासाठी पालक मुलांना पाठवण्याचे धाडस करीत नाही. परदेशात अशा कोर्सला महत्व दिले जाते. त्यात जगात व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग मध्ये इंडियन आर्मी एक नंबरवर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यातील अनुभवी प्रशिक्षकाकडून हे सर्व कोर्स शिकवले जातात.
भारतातून पाचोऱ्यातील सहीष्णा सचिन सोमवंशी ही सर्वात कमी वयाची अठरा वर्षाची मुलगी म्हणून हा कोर्स केल्याची पहिलीच ठरली आहे. तिने हा बहुमान खान्देशला दिला आहे. तिच्या यशात तिचे पालक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी व आई सुप्रिया सोमवंशी आजोबा आजी यांचा सहभाग आहे. सहीष्णा सोमवंशी ही ज्या टीममध्ये गेली.त्यात अकरा महिला सदस्यांचा सहभाग होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App