नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने माध्यमनिर्मित चाणक्यांसह अनेकांचे डोळे पांढरे झाले असले, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात एक बाब स्पष्टपणे उघड झाली, ती म्हणजे संघ उतरला मैदानात; हिंदुत्वाची जाती द्वेषाच्या अजेंड्यावर मात!!RSS and its 65 organisations are the real mastermind of mahayuti success!!
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे यांच्या रूपाने सुरुवातीला सामाजिक आंदोलनाला हवा देऊन “मास्टर माईंड”ने त्याचा राजकीय वापर करायचा प्रयत्न केला, पण तोच त्याच्यावर उलटला. लोकसभेला राज्यघटना बदलाचा अजेंडा चालला. जरांगेंच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीला फायदा झाला. त्यामुळे महाविकास आघाडीचा हुरूप वाढला. शरद पवारांची “चाणक्य” प्रतिमा माध्यमांनी उजळवून काढली. जणू काही शरद पवार म्हणजेच महाराष्ट्र आणि ते म्हणजेच “चाणक्य” असे चित्र “पवार बुद्धी”च्या माध्यमांनी रंगविले.
पण माध्यमकर्मींची बुद्धी जरी अशी “पवार बुद्धी”ने भ्रष्टविली असली, तरी महाराष्ट्राची बुद्धी तेवढी भ्रष्ट झाली नाही. महाराष्ट्राची विवेक बुद्धी शाबूत राहिली, हेच निवडणूक निकालांनी दाखवून दिले.
संघ परिवार 65 संघटना
यात लाडकी बहीण योजनेचे यश तर आहेच, ते नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या नंतरच्या चार महिन्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या 65 संघटना महाराष्ट्राच्या मैदानात उतरल्या होत्या, त्यांचे काम महायुतीच्या प्रचंड यशामध्ये परावर्तित झाले. संघ आणि संघ परिवारातील 65 छोट्या मोठ्या संघटनांनी महाराष्ट्रातील 288 मतदार संघ शांतपणे अक्षरशः पिंजून काढले. मतदार याद्यांवर मायक्रो लेव्हलवर काम केले. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून तो मतदान केंद्रावर येऊन मतदान करेल, यासाठी प्रभावी यंत्रणा राबविली. याचा कुठलाही माध्यमनिर्मित गाजावाजा केला नाही. रोजच्या रोज कुठल्याही व्यक्तीला अथवा नेत्याला शिव्या घातल्या नाहीत. याला पाडतो…, त्याला बघतो…, असली “जरांगी” दमबाजीची भाषा वापरली नाही.
संघ स्वयंसेवक आणि परिवारातील कार्यकर्ते शांतपणे आपापले नेमून दिलेले काम करत राहिले त्यातून वाड्या, वस्त्या, शहरी निमशहरी सोसायट्या, आदिवासी, ओबीसी, निम्न मध्यमवर्ग, मध्यमवर्ग या सगळ्यांचे मतदान वाढले आणि मतदानाचा एकूण टक्कामोठ्या प्रमाणावर वाढला.
यात महाराष्ट्रातला महिलावर्ग खऱ्या अर्थाने पुरोगामी ठरला. कारण तो जातीपातीच्या पलीकडे गेला. मध्यम निर्मित चाणक्याच्या जाती-पातीच्या अजेंड्याच्या चक्रव्यूहात महिलावर्ग अडकला नाही. महायुतीने दिलेले 2100 रुपये त्यांना चालले, पण काँग्रेसी 3000 रुपयांच्या खटाखट मध्ये महिला अडकल्या नाहीत, हे या निवडणुकीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य ठरले.
माध्यम निर्मित चाणक्य उद्धवस्त
लोकसभा निवडणुकीनंतर माध्यमनिर्मित चाणक्यांची प्रतिमा निर्मिती तर प्रचंड मोठी झाली होती. जरांगेंचे आंदोलन देखील त्यांनी जोरावर ठेवले होते. पण त्यातूनच महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचा अहंकार फुलला होता. आता फक्त मतदान व्हायचे बाकी, आपण सत्तेवर आलोच, असा दर्प महाराष्ट्र मराठी माध्यमनिर्मित चाणक्यांना झाला होता. पण माध्यमांमधून अशी वातावरण निर्मिती करणे निराळे आणि प्रत्यक्ष ग्राउंड लेव्हलवर उतरून काम करणे निराळे यातला फरक महाराष्ट्रामध्ये संघ आणि परिवारातील 65 संस्थाने संघटनांनी दाखविला.
बटेंगे तो कटेंग, एक रहेंगे तो सेफ रहेंगे या योगी + मोदींच्या घोषणा होत्या, पण त्यामागचे खरे काम संघ आणि परिवारातल्या 65 संघटनांनी केले. कारण ते काम जर झाले नसते, तर या दोन्ही घोषणा हवेत विरायला वेळ लागला नसता पण अखेरीस संघ मैदानात उतरला आणि हिंदुत्वाच्या अजेंड्याने जाती-पातीच्या अजेंड्यावर मात करून दाखविली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App