Row over naming Mumbai garden after Tipu Sultan : मुंबईतील एका उद्यानाला मुस्लिम शासक टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मागणीमुळे नवा सुरू झाला आहे. गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने केली. या मागणीला पालिका प्रशासनही अनुकूल असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर हिंदू जनजागृती समितीसह अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला आहे. उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यास विरोधी दर्शवण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले आहे. Row over naming Mumbai garden after Tipu Sultan, right-wing outfit says move will hurt sentiments
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील एका उद्यानाला मुस्लिम शासक टिपू सुलतानचे नाव देण्याच्या मागणीमुळे नवा सुरू झाला आहे. गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने केली. या मागणीला पालिका प्रशासनही अनुकूल असल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर हिंदू जनजागृती समितीसह अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला आहे. उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यास विरोधी दर्शवण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले आहे.
सपाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दिकी या मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. 136 मधून नगरसेविका आहेत. प्रभागातील साकीनाका डम्पिंग रोड येथील पालिका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली होती.
महापालिकेने रुक्साना सिद्दिकी यांच्या मागणीला अनुकूलता दर्शवत हिरवा कंदील दिल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेत लेखी निवेदनही दिले आहे. महापालिकेच्या या उद्यानाला इतर एखाद्या राष्ट्रपुरुषाचे नाव द्यावे, अन्यथा हिंदू समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी निवेदनकर्त्यांना याप्रकरणी मी स्वत: प्रशासकीय नियम काय सांगतात हे पाहून लक्ष घालते असे आश्वासन दिले आहे.
Row over naming Mumbai garden after Tipu Sultan, right-wing outfit says move will hurt sentiments
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App