वृत्तसंस्था
पुणे : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पॉझिटिव्हिटी दर आणि रुग्ण असलेले ऑक्सिजन बेड यांची संख्या लक्षात घेऊन पाच टप्प्यांत निर्बंध हटवण्यात येत आहे. दरम्यान, आठवड्यात पुण्यात निर्बंध जैसे थेच राहणार आहेत.Restrictions in Pune from Monday as earlier ! ;Corona review meeting suggested
पुण्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कौन्सिल हॉल येथे ही पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक घेतली गेली. त्यावेळी ते बोलत होते.
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहतील. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.निर्बंध शिथिल केल्यानंतर पॉझिटिव्हिटी दर वाढ आहे. त्यामुळे तो आणखी वाढेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहणार आहेत. शाळा- कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद असतील, असंही त्यांनी सांगितलं.
पुणेकरांसाठी सोमवारपासून काय सुरू
५ जून २०२१ रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार.
कृषी संबंधित दुकाने आणि संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App