शिंदे सेनेच्या वाढीसाठी 39 नेत्यांवर पक्ष बांधणीची जबाबदारी; पण दोन्ही पवारांच्या पक्षांमध्ये एकमेकांवर खापर फोडणी!!

नाशिक : शिंदे सेनेच्या वाढीसाठी 39 नेत्यांवर पक्ष बांधणीची जबाबदारी; पण दोन्ही पवारांच्या पक्षांमध्ये एकमेकांवर खापर फोडणी!!, हेच राजकीय वास्तव महाराष्ट्रातून समोर आले. Shinde Sena

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिकपणे राजकीय पंगा घेऊन मूळ शिवसेना पक्ष वाढविला. त्यात महाराष्ट्रातून आणि केंद्रातून अडथळे आल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे स्वतःच्या पद्धतीने काम करत राहून पक्ष वाढवत राहिले. केंद्रातल्या किंवा महाराष्ट्रातल्या अडथळ्यांचा त्यांनी कुठला बाऊ केल्याचे दिसले नाही. म्हणूनच भाजपने ऑपरेशन टायगर थांबविल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेची वाढ थांबता कामा नये यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले‌. त्यांनी एक-दोन नव्हे, तर डबल 39 नेत्यांवर शिवसेना बांधण्याची जबाबदारी दिली. यात श्रीकांत शिंदे यांच्यापासून ते मनीषा कायदे यांच्यापर्यंत सगळ्यांना पक्ष बांधणीच्या कामात जुंपले. भाजपच्या सत्तेचा पुरेपूर लाभ आपल्या पक्षाला सुद्धा झाला पाहिजे, अशा सक्त सूचना एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्या.

– राष्ट्रवादीने फक्त सत्तेचे लाभ ओरबाडले

त्या उलट भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन सुद्धा पवारांच्या पक्षाला सत्तेचे किरकोळ लाभ ओरबाडण्याखेरीज दुसरे काही करता आले नाही उलट अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर दोन्ही पवारांच्या पक्षात जी बेदिली माजली, दोन्ही पवारांना अजून सावरता आली नाही. उलट रोहित पवार, अमोल मिटकरी यांच्यासारख्या नेत्यांनी बेदिली मध्ये भरच घातली. कुठलेही पवार सोडून त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींमधल्या इतर नेत्यांवर खापर फोडणी केली.

– रोहित पवार, अमोल मिटकरींची आगपाखड

रोहित पवारांना सत्तेचा तुकडा मिळाला नाही म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर दात धरला. सुनील तटकरे यांना बटाईदार म्हटले. अमोल मिटकरींनी नरेश अरोरा विरुद्ध भलीमोठी पोस्ट घेऊन आगपाखड केली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तरी त्यांना अपेक्षित यश आले नाही. अजित पवार हयात असताना सुद्धा दोन्ही राष्ट्रवादींना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये दणकून पराभव पत्करावा लागला. अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर दोन्ही राष्ट्रवादींना पुणे जिल्हा परिषद वगळता इतर जिल्हा परिषदांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यात आले नाही.

– शरद पवार गटाचा चडफडाट

सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या हातातली बाजी निसटली हे लक्षात येताच सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोन्ही राष्ट्रवादींच्या अंतर्गत वादाच्या राजकारणाच्या चित्रातून “बाहेर” निघून गेले. अन्यथा अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर संपूर्ण राष्ट्रवादीवर कब्जा मिळवायचा त्यांचा “डाव” होता. तो “डाव” भाजप, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उधळून लावला. त्यामुळे शरद पवार गटाचा चडफडाट झाला. रोहित पवारांच्या तोंडून तो सगळा चडफडात बाहेर पडत राहिला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यातून नामानिराळे राहिले.

– राष्ट्रवादी सत्तेसाठी हावरट

पण या सगळ्या वादामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांचा सत्तेसाठीचा हावरटपणा सगळ्या महाराष्ट्रासमोर उघडा पडला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा तुकडा तर मिळाला नाहीच. उलट रोहित पवारांच्या आदळ आपटीमुळे अख्खा पक्ष सत्तेपासून दूर गेला.



– खरा वाद सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार

या सगळ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या नव्याने बांधणीचा मुद्दा तर शिल्लकच राहिला नाही. उलट सुनेत्रा पवारांच्या पुढे नवी नवी आव्हाने उभी राहिली. त्यांच्या नेतृत्वाला आतून आणि बाहेरून सुरुंग लावण्याचा जोरदार “डाव” खेळला गेला. म्हणून तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची पुन्हा चर्चा सुरू केली गेली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा वाद हा नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा असताना त्या वादाचे सगळे खापर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि नरेश अरोरा यांच्यावर फोडायचा उपद्व्याप झाला. यातून दोन्ही राष्ट्रवादींची खरी प्रतिमाहानी झाली.

– एकनाथ शिंदे ठरले हुशार

पण या सगळ्यात एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने हुशार ठरले. भाजपने ऑपरेशन टायगर स्थगित केले. ठाकरे सेना आणि पवारांची राष्ट्रवादी यांच्यातले खासदार शिवसेनेत घ्यायला भाजपने नकार दिला, तरी एकनाथ शिंदे थांबले नाहीत. त्यांनी शिंदे सेनेच्या बांधणीसाठी 39 नेत्यांकडे जबाबदारी देऊन भाजपच्या सत्तेचा दीर्घकालीन लाभ घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.

Responsibility for Party Building Entrusted to 39 Leaders for the Growth of the Shinde Sena

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात