प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील 10 हजार 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची, माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. Recruitment of 10000 posts in Health Department in Zilla Parishads of Maharashtra
भरती प्रक्रिया तातडीने
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट- क संवर्गांपैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. 2019 च्या जाहिरातीनुसार, आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आतापर्यंत 400000 अर्ज आले असून, या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता तातडीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
पदसंख्या अशी…
आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकांची 47 पदे, औषध निर्मात्याची 324 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 96, आरोग्यसेवकाची 3 हजार 184 पदे आणि आरोग्यसेविकांची 6 हजार 476 पदे अशी एकूण 10 हजार 127 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App