Loan Fraud : देशातील बँकांची 5 लाख कोटींची कर्ज फसवणूक, SBI सोबत सर्वात जास्त 78 हजार कोटींचे फ्रॉड

RBI data Shows 5 lakh Crore Loan Fraud With Indian Banks Including Private Sector

Loan Fraud : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, भारतात जेवढ्या बँका सुरू आहेत, त्यांची 31 मार्च 2021 पर्यंत तब्बल 4.92 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी अशा दोन्ही बँकांचा समावेश आहे. बँकांच्या एकूण क्रेडिटच्या 4.5 टक्के फसवणूक झाली आहे. हा खुलासा एका आरटीआयमधून झाला आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या वृत्तानुसार सौरभ पंधारे यांनी ही आरटीआय दाखल केली होती. RBI data Shows 5 lakh Crore Loan Fraud With Indian Banks Including Private Sector


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, भारतात जेवढ्या बँका सुरू आहेत, त्यांची 31 मार्च 2021 पर्यंत तब्बल 4.92 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये खासगी आणि सरकारी अशा दोन्ही बँकांचा समावेश आहे. बँकांच्या एकूण क्रेडिटच्या 4.5 टक्के फसवणूक झाली आहे. हा खुलासा एका आरटीआयमधून झाला आहे. ‘बिझनेस स्टँडर्ड’च्या वृत्तानुसार सौरभ पंधारे यांनी ही आरटीआय दाखल केली होती.

या अहवालानुसार, देशातील संचालित 90 बँका आणि आर्थिक संस्थांनी 31 मार्च 2021 पर्यंत एकूण 45,613 फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद केली आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट ऑफ इंडियाने सर्वात जास्त रकमेच्या कर्ज फसवणुकीची नोंद केली आहे. एसबीआयची 78,072 कोटी रुपयांच्या कर्जाची फसवणूक झाली आहे. यानंतर सर्वाधिक पंजाब नॅशनल बँकेसह 39,733 कोटींची फसवणूक झाली आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडियाकडे 32,224 कोटी, युनियन बँकेकडे 29,572 कोटींची फसवणूक आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 27,341 कोटींची फसवणूक झाली आहे.

फसवणूक झालेल्या टॉप 5 सरकारी बँका

एसबीआय – 78,072 कोटी
पीएनबी – 39,733 कोटी
बीओआय – 32,224 कोटी
युनियन बँक – 29,572 कोटी
बँक ऑफ बडोदा – 27,341 कोटी

फसवणूक झालेल्या टॉप 5 खासगी बँका

आयसीआयसीआय – 26,084 कोटी
आयडीबीआय – 21333 कोटी
कॅनरा बँक – 20861 कोटी
इंडियन ओव्हरसीज – 19906 कोटी
येस बँक – 19771 कोटी

नियम बदलल्याने फ्रॉडचे खुलासे वाढले

अर्थ मंत्रालयाने 2018 मध्ये जारी केलेल्या आदेशामुळे कर्ज फसवणुकीच्या प्रकारांचे खुलासे वेगाने होत आहेत. या आदेशाअंतर्गत 50 कोटींपेक्षा जास्त नॉन परफॉर्मिंग अकाउंटची चौकशी फसवणूक लक्षात घेऊन केली जावी आणि याची सूचना सीबीआयलाही देण्यात यावी. याचमुळे मागच्या दोन वर्षांपासून फसवणुकीच्या प्रकरणांची नोंद वाढली आहे.

RBI data Shows 5 lakh Crore Loan Fraud With Indian Banks Including Private Sector

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात