विशेष प्रतिनिधी
बुलडाणा : एसटी कर्मचाऱ्यांसोबतच आता राज्यातील शेतकरीही आक्रमक झाले आहेत. सोयाबीन व कपाशीला भाव मिळावा, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.Ravikant Tupkar’s health deteriorated, Swabhimani activists’ violent agitation, police vehicle, ambulance glass smashed
संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची तब्येत खालावल्याने कार्यकर्ते संतप्त झाले असून हिंसक आंदोलनाला सुरूवात केली आहे. पोलीसांची वाहने, रुग्णवाहिकेच्या काचा फोडल्या आहेत.सोयाबीन व कपाशीला अनुक्रमे ८ हजार व १२ हजारांचा स्थिर भाव द्यावा, सोयाबीन पेंड आयात तत्काळ रद्द करावी,
सोयाबीन व तेलबिया साठा मयार्दा उठवावी, १०० टक्के पीकविमा द्यावा, खोटे अहवाल बनवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपन्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अन्नत्याग आंदोलनाने १९ नोव्हेंबर रोजी हिंसक स्वरुप धारण केले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या वाहनांसह रुग्णवाहिकाही फोडली.
संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे नागपूर येथे अन्नत्याग आंदोलनासाठी गेले असता, पोलिसांनी त्यांना अटक करून बुलडाण्यात आणून सोडले. तुपकर यांनी बुलडाण्यातील निवासस्थानीसुद्धा अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावल्याने सायंकाळी स्वाभिमानीच्या कथित कार्यकर्त्यांनी चिखली रोडवर पोलिसांचे एक वाहन तर एक रुग्णवाहिका फोडून राग व्यक्त केला.
या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्यासह तीन शीघ्र कृती दलाची पथके, एक दंगाकाबू पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रविकांत तुपकरांची प्रकृती खालावल्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एका कार्यकत्यार्ने आत्मदहनाचा प्रयत्न केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App