विशेष प्रतिनिधी
जालना : Raosaheb Danve राज्यात महायुतीच्या 180 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. त्यांनी भोकरदनमध्ये सहकुटुंब मतदान केले. राज्यातील मतदार महायुतीच्या पाठी आहेत. लोकसभेपेक्षा यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह असून राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.Raosaheb Danve
भोकरदन शहरातील जिल्हा परिषद शाळेत सकाळी आठ वाजेच्या सुमारास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांचे सुपुत्र भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांच्यासह सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार संतोष दानवे व महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. भाजपचा गड असलेल्या या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा दबदबा आहे मतदारसंघात केलेली विकास कामे, तसेच महायुती सरकारनच्या विविध लोककल्याणकारी योजना व मतदारसंघात असलेल्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी या जोरावर यावेळी भोकरदनचा गड भाजप कायम राखेल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App