विशेष प्रतिनिधी
अलिबाग – , हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांनी मापगाव परिसरात ९० गुंठे जमीन २२ कोटी रुपयांना खरेदी केली आहे.Ranveer – depika buyes land in Alibagh
अलिबागमधील निसर्गरम्य समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत आहेत. त्यामुळे अलिबागला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शविली जाते. अलिबागच्या निसर्गरम्य ठिकाणी जागा घेऊन शांतपणे राहणे सर्वांनाच आवडू लागले आहे. त्यामुळे मांडवा, किहीम, रेवस, नागाव, रेवदंडा, आक्षी, अशा अनेक ठिकाणी राजकीय, उद्योजकांनी जागा घेऊन बंगले बांधले आहेत. सिनेकलाकारदेखील यामध्ये मागे नाहीत.
अलिबाग तालुक्यात शहारुख खानसह अनेक सिनेकलाकारांनी जागा घेऊन बंगले बांधले आहेत. त्यात आता रणवीर सिंग आणि दीपिकाचीही भर पडली आहे. या खरेदीच्या शासकीय पूर्ततेसाठी सोमवारी ते दोघे येथे आले असल्याचे समोर आले आहे. दोघेही सकाळीच अलिबागमधील दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App