वृत्तसंस्था
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एका सराफाकडे गृहमंत्रालयाच्या नावाखाली पाच लाख रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप पोलीस निरीक्षकावर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.Ransom demand of Rs 5 lakh from Sarafa in the name of Home Ministry, allegations against police inspector; Excitement over the fall incident
याबाबतचा व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्वीट करून हे प्रकरण उजेडात आणलं आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात फक्त वैद्यकीय दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे.
दुसरीकडे अमृतराव गुगळे यांनी सोन्याचे दुकानं सुरु ठेवले. तेव्हा बार्शी पोलिसांनी दुकानं सील केलं होते.मात्र, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकानं सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी गुगळेंनी केला.
”हे सर्व हप्ते गृहमंत्रालयापर्यंत पोचवावे लागतात,” असं ही गिरीगोसावींनी गुगळे यांना म्हटल्याचा आरोप केला आहे. याबाबतचा व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्वीट करून हे प्रकरण उजेडात आणलं आहे.
या संदर्भात संतोष गिरीगोसावी यांनीआरोप फेटाळले आहेत. गुगळेंविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे म्हटलं आहे.
जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकतेय
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केल्याची घटना ताजी आहे. त्यावरून आरोप- प्रत्यारोप, राजीनामे यांनी महाराष्ट्र ढवळून निघाला होता.
आता पोलीस निरीक्षकवरील खंडणीच्या या नव्या आरोपामुळे गृहमंत्रालयाच्या आणि पोलिसांच्या पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कामकाजाबाबत शंकेची पाल जनतेच्या मनात चुकचुकत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App