विशेष प्रतिनिधी
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.Rane supporters and Shiv Sainiks gathered outside Narayan Rane’s house
रायगड येथील महाडमध्ये जनआशिर्वाद यात्रेदरम्यान पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केले. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
युवा सेनेचे नेते वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करत बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राणे समर्थक आणि युवासैनिक समोर आल्याने जुहू परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.
मुंबईत युवासेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानावर धडक देत आंदोलन केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App